युवा उत्सव 2023 अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

 

युवा उत्सव 2023 अंतर्गत आयोजित

विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

लातूर, दि. 28 (जिमाका): भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिम्मित भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत लातूर येथे 30 जून 2023 रोजी ‘युवा उत्सव’चे आयोजन करण्यात येत आहे. या युवा उत्सवात युवा कलाकार चित्रकला स्पर्धा, युवा लेखक कविता स्पर्धा, मोबाइल फोटोग्राफी स्पर्धा, भाषण स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन लातूर नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया यांनी केले आहे.

 

लातूर नेहरू युवा केंद्र आणि लातूर कृषि महाविदयालय यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन 30 जून 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लातूर येथील नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. या अंतर्गत आयोजित स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील युवा-युवतींना भाग घेता येईल. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

 

जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे पुरस्काराचे स्वरुप

युवा कलाकार पेंटिंग स्पर्धा, युवा लेखक स्पर्धा - कविता लेखन स्पर्धा आणि मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस प्रत्येकी एक हजार रुपये, द्वितीय बक्षीस प्रत्येकी साडेसातशे रुपये आणि तृतीय बक्षीस प्रत्येकी पाचशे रुपये आहे. भाषण स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस पाच हजार रुपये, द्वितीय बक्षीस दोन हजार रुपये आणि तृतीय बक्षीस एक हजार रुपये राहील. तसेच सांस्कृतिक उत्सव समूह लोकनृत्य स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस पाच हजार रुपये, द्वितीय बक्षीस अडीच हजार रुपये आणि तृतीय बक्षीस एक हजार 250 रुपये राहील.

युवा उत्सवात युवकांच्या सर्वांगीण विकासाठी  विविध शासकीय विभागाच्या योजनांचे माहितीविषयक स्टॉल लावण्यात येणार आहेत.  स्पर्धेत भाग घेण्यासाठी https://forms.gle/ibF32r96Rb6QZsEJ8  या ऑनलाईन लिंकवर नोंदणी करता येईल. तसेच स्पर्धेच्या दिवशी ऑफलाईन नोंदणी देखील करता येईल. .  अधिक माहितीसाठी मोबाइल क्रमांक 7838628657 किंवा 9823322895 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील जास्तीत युवकांनी भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया, तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे यांनी केले आहे

                                                       ****

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु