शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नुतनीकरण 30 जूनपूर्वी करावे -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नुतनीकरण 30 जूनपूर्वी करावे

-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

लातूर,दि.27(जिमाका):- खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, नवीन पीक कर्ज वाटप करणे, तसेच विद्यमान पीक कर्ज वाढीसह नूतनीकरण करणे आवश्यक आहे. कर्ज नूतनीकरणासाठी सर्व बँका गावागावात शिबिरे आयोजित करून पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांना घरोघरी भेटून आवाहन करीत आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नूतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प मुदतीच्या पीक कर्जाची परतफेड 365 दिवसांच्या आत किंवा दरवर्षी 30 जून रोजी किंवा त्यापूर्वी केली पाहिजे. पीक कर्जाचे नूतनीकरण केल्यानंतर, शेतकरी  कर्जाच्या रकमेत वाढीसाठी पात्र होतात. जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख योजना आणि केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत प्रत्येकी 3 टक्के व्याज सवलत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना शून्य व्याजाने कर्ज मिळते. पीक कर्जाचे वेळेवर नूतनीकरण केल्यामुळे शेतकरी बँकांच्या इतर सुविधांचाही लाभ घेऊ शकतात. कर्ज चुकते न झाल्यास, पीक कर्ज खाते थकीत खाते बनते. अशा शेतकऱ्यांसाठी बचत खात्यातील व्यवहारावर मर्यादा येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाचे नूतनीकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

 

 

**** 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा