पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा; शेती-पिकांच्या नुकसानीची करणार पाहणी

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा; शेती-पिकांच्या नुकसानीची करणार पाहणी लातूर, दि. ०९ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे ९ ते ११ ऑक्टोबर २०२६ दरम्यान लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये ते जिल्ह्यातील शेती-पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. शुक्रवारी, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ते मोटारीने पुणे येथून लातूरकडे प्रयाण करतील. रात्री त्यांचे लातूर येथे आगमन होईल व मुक्काम. पालकमंत्री श्री. भोसले हे शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता उदगीर तालुक्यातील शेकापूर येथे शेती-पिकांच्या नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर ते जळकोट तालुक्यातील बेळसांगवी येथे भेट देऊन पीक नुकसानीचा आढावा घेतील. तेथून पुढे अहमदपूर येथे आगमन व राखीव. त्यानंतर महादेववाडी येथे भेट देऊन पिकांची पाहणी करतील. यानंतर आष्टामोड, कोळपा आणि महाराणा प्रताप नगर येथे भेट देऊन तेथील शेती-पिकांच्या नुकसानीची सविस्तर पाहणी करतील. त्यानंतर राखीव. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी सोयीनुसार मोटारीने लातूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत