चाकूर पोलीस ठाणे परिसरातील ६ वाहने १५ दिवसांत घेऊन जाण्याचे मालकांना आवाहन

चाकूर पोलीस ठाणे परिसरातील ६ वाहने १५ दिवसांत घेऊन जाण्याचे मालकांना आवाहन लातूर, दि. ०९ (जिमाका): चाकूर पोलीस ठाणे येथील वार्षिक तपासणीदरम्यान पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिलेल्या सूचनेनुसार चाकूर पोलीस ठाण्याच्या परिसरात अनेक वर्षांपासून असलेली ६ वाहने त्यांच्या मूळ मालकांनी १५ दिवसांच्या आत घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस ठाणे परिसरात असलेली वाहने आपल्या मालकी हक्काचा योग्य तो पुरावा सादर करून वाहन मालकांनी ताब्यात घ्यावीत. या ६ वाहनांच्या मालकांनी १५ दिवसांच्या आत आवश्यक ती कायदेशीर पूर्तता करून वाहने घेऊन जाण्याची कार्यवाही करावी, अन्यथा पुढील नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. जप्त किंवा पडून असलेल्या वाहनांमध्ये फोर्ड (फोर्स) कंपनीचा मालवाहू टेम्पो (MH 24 J 5867), बजाज कंपनीचा तीनचाकी ऑटो (MH 24 J 2800), टाटा स्टारबस कंपनीची स्कूल बस (MH 11 T 9501 - या बसवर ४ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे), टाटा कंपनीची इंडिका कार (MH 12 GZ 4842), मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार (MH 26 BC 8286) आणि ॲपे कंपनीचा तीनचाकी मालवाहू ऑटो (MH 14 AS 3028) या वाहनांचा समावेश आहे. तरी संबंधित वाहनधारकांनी त्वरित चाकूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आपली वाहने घेऊन जावीत, असे आवाहन चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत