Posts

Showing posts from August, 2025

पर्जन्यमान/आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील अहवाल जिल्हा लातूर दिनांक 29.08.2025 (सायंकाळी 5 वा.)

पर्जन्यमान/आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील अहवाल जिल्हा लातूर दिनांक 29.08.2025 (सायंकाळी 5 वा.) दिनांक 29/08/2025 रोजी लातूर जिल्ह्यामध्ये सरासरी 91.8 मिमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरी 189.6 मिमी पर्जन्यमानाच्या तुलनेत प्रत्याक्षात 336.0 मिमी पाऊस झाला आहे. दि. 1 जूनपासून आतापर्यंतचा पाऊस अपेक्षित सरासरी 511.9 मिमी पर्जन्यमानाच्या तुलनेत 107.3 टक्के म्हणजेच 549.2 मिमी इतका पाऊस झालेला आहे. लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी (जून ते सप्टेंबर) 706.0 मिमीच्या तुलनेत 77.8% इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दि.29.08.2025 रोजी 60 पैकी 36 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिवीत हानी- निरंक पशुहानी - मौजे धसवाडी तालुका अहमदपूर येथील शेतकरी लक्ष्मण नामदेव गोजेगावकर याची गाय पावसामुळे नाल्यात आलेल्या पुरामुळे मयत झाली आहे. मौजे, हाळी तालुका उदगीर येथे श्री. खाजामैनोद्दीन तांबोळी यांच्या शेतातील गोठ्यात पाणी शिरुन 2 गाभण म्हशी व देवणी जातीची। गाभण गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मौ. गुत्ती ता. जळकोट येथील श्री हुलाजी व्यंकट केंद्रे यांच्या 6...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेविषयी ३ सप्टेंबर रोजी माजी सैनिकांसाठी केले जाणार मार्गदर्शन

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेविषयी ३ सप्टेंबर रोजी माजी सैनिकांसाठी केले जाणार मार्गदर्शन लातूर, दि. २९ (जिमाका): जिल्हा उद्योग केंद्रामार्फत माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी आणि अवलंबितांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ दिला जात आहे. या योजनेंतर्गत विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन आणि आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता लातूर येथील माजी सैनिक मुलांच्या वसतिगृह येथे उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी आणि अवलंबितांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे. *****

लातूर जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांसाठी कृषी औजारांवर अनुदान योजना

लातूर जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांसाठी कृषी औजारांवर अनुदान योजना लातूर, दि. 29 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सन 2025-26 मध्ये सेस निधीतून शेतकऱ्यांना कडबाकुट्टी, रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र (बीबीएफ) आणि स्लरी फिल्टर खरेदीसाठी डीबीटी तत्त्वावर अनुदान देण्याची योजना राबवली जात आहे. शेती खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या या योजनेसाठी 29 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी 15 सप्टेंबर 2025 पर्यंत पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दीपक सुपेकर यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समिती कार्यालयात किंवा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून घेऊन, आवश्यक कागदपत्रांसह (सातबारा, आठ अ उतारा, जातीचा दाखला (अनुसूचित जाती/जमातींसाठी), ट्रॅक्टरचा पुरावा (बीबीएफसाठी)) 15 सप्टेंबर 2025 पर्यंत जमा करावेत. अर्जांची छाननी करून ज्येष्ठता सूचीनुसार पात्र लाभार्थ्यांना पूर्वसंमती दिली जाईल. खरेदीनंतर मोका तपासणी होऊन अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात (डीबीटी) जमा होईल. तरी शेतकऱ्य...

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी एकरकमी व्याज सवलत योजनेचा लाभ

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी एकरकमी व्याज सवलत योजनेचा लाभ लातूर, दि. 29 (जिमाका): महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने संपूर्ण थकीत कर्ज प्रकरणांसाठी एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याज रकमेवर 50 टक्के सवलत (वन टाइम सेटलमेंट - ओटीएस) देणारी सुधारित योजना 31 मार्च 2026 पर्यंत लागू केली आहे. या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीदार लाभार्थ्यांनी कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, जात पडताळणी इमारत, जुनी डालडा फॅक्ट्री, शिवनेरी गेटसमोर, गुळ मार्केट, लातूर येथील महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. *****

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना लातूर, दि. 29 (जिमाका): राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन 2023-24 पासून लातूर जिल्ह्यात दोन शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. यात मुलांसाठी 100 आणि मुलींसाठी 100 अशा एकूण 200 विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांचा समावेश आहे. या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्य मोफत पुरवले जाते. या वसतिगृह प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 18 सप्टेंबर 2025 पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असून पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी त्या शहराचा स्थानिक रहिवाशी नसावा, जिथे शैक्षणिक संस...

सावित्रीबाई फुले आधार आधार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सावित्रीबाई फुले आधार आधार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 29 (जिमाका): राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती (भटक्या जाती क वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या, परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 साठी सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 600 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेद्वारे महसुली विभाग शहर आणि क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्त्यासाठी 43 हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांना 38 हजार रुपये आणि तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 32 हजार रुपये थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा आणि वसतिगृह प्रवेशास पात्र असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक...

मांजरा प्रकल्पातील वाढत्या विसर्गामुळे लातूर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

मांजरा प्रकल्पातील वाढत्या विसर्गामुळे लातूर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा लातूर, दि. २९ : मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पातून मांजरा नदीत वेळोवेळी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. २८ आणि २९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रात सध्या १५ हजार ७२४ क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून, यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मांजरा आणि तिच्या उपनद्यांच्या काठावरील गावांतील नागरिक, शेतकरी आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या सर्वांना सतर्क राहण्याचे आणि विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, आपली मालमत्ता आणि जनावरे यांची काळजी घ्यावी, तसेच पाण्याच्या वेढ्यात अडकणार नाही याची खबरदारी घ्यावी. दुभती आणि इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्रोताजवळ किंवा विद्युत खांबाजवळ बांधू नयेत, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. जलसाठ्याजवळ किंवा नदीकाठी जाण्याचे टाळावे. मुलांना पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याबाबत जागरूक करावे. पुलावरून किं...

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 91.8 मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 91.8 मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. 29 (जिमाका): जिल्ह्यात 29 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 91.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये चाकूर तालुक्यात सर्वाधिक 152.4 मिलीमीटर, तर औसा तालुक्यात सर्वात कमी 32 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- लातूर- 81.2, औसा- 32, अहमदपूर- 145.2, निलंगा- 45.2, उदगीर- 123.6, चाकूर- 152.4, रेणापूर- 106.4, देवणी- 75.8, शिरूर अनंतपाळ- 102.5 आणि जळकोट- 112.6 मिलीमीटर. पावसाची नोंद झाली आहे. ***

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 62.8 मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 62.8 मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात 28 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 62.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये जळकोट तालुक्यात सर्वाधिक 77.7 मिलीमीटर, तर उदगीर तालुक्यात सर्वात कमी 50 मिलीमीटर पाऊस झाला आहे. ***

राष्ट्रीय महामार्ग ते आलमला मार्गावरील पूल दुरुस्त करण्याच्या सूचना

Image
राष्ट्रीय महामार्ग ते आलमला मार्गावरील पूल दुरुस्त करण्याच्या लातूर दि. 26: औसा-लातूर राष्ट्रीय महामार्ग ते आलमला-उंबडगा रस्त्यावरील पुलाचे काम सुरु असून याठिकाणी तात्पुरता पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या पर्यायी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. सद्यस्थितीत पाण्याच्या प्रवाहाची स्थिती पाहून पर्यायी रस्त्यावरील पूल दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार यांना दिल्या असल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता ए. ए. खैरादी कळविले आहे. पर्यायी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत आल्यानंतर आलमला गावातील नागरिकांना औसा येथे जाण्यासाठी विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निक कॉलेज मार्गे वॉटर फिल्टर ते औसा, तसेच रामा-२४२ मार्गे औसा व लातूर येथे जाण्यासाठी गंगापूरमार्गे लातूर या मार्गाने वाहतूक करण्याबाबत कळविण्यात आले होते. तसेच उंबडगा गावातील नागरिकांना औसा येथे जाण्यासाठी ग्रामीण मार्ग-१७ मार्गे औसा व लातूर येथे जाण्यासाठी इजिमा-१३३ साबरमती विद्यालय येथून राममा-३६१ मार्गे लातूर जाण्...

गणेशोत्सवानिमित्त 27 ऑगस्ट व 2 सप्टेंबर रोजी मद्यविक्री बंद

गणेशोत्सवानिमित्त 27 ऑगस्ट व 2 सप्टेंबर रोजी मद्यविक्री बंद लातूर दि. 26: लातूर जिल्ह्यात 27 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर, 2025 या कालावधीत गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात यांची साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी 27 ऑगस्ट 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व किरकोळ अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे, तसेच 2 सप्टेंबर, 2025 रोजी उदगीर नगर परिषद हद्दीतील सर्व किरकोळ अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत. मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 तसेच नमूद कायद्यांतर्गत केलेल्या विविध नियमानुसार जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर - घुगे यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करणाऱ्या अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्तीधारका विरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 व अनुषंगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई करण्यात यईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ****

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 26 (जिमाका): राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, आणि ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये 1 लक्ष रुपये, 75 हजार रुपये, 50 हजार रुपये आणि 25 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येते. तसेच राज्यातील एक र...

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ लातूर, दि. 26 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची 13 व मुलींची 12 अशी एकूण 25 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांची सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होत असून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी https://hmas.mahait.org या लिंकचा वापर करुन विद्यार्थी वसतिगृहासाठी प्रवेश अर्ज भरु शकतात. या वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी 15 सप्टेंबर, 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी स्थानिक गृहप्रमुख, गृहपाल यांचेकडे संपर्क साधून विहित वेळेत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावेत, असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी आवाहन केले आहे. ****

आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी ई-पीक पाहणी करावी

आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी ई-पीक पाहणी करावी लातूर, दि. २६ : हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्यावतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मुग, उडीद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे. आधारभूत दराने खरेदी करण्यासाठी ई-पिक पाहणी असलेला सातबारा उतारा आवश्यक आहे. तसेच खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार आहे. तरी केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पीक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघामार्फत करण्यात येत असल्याचे लातूर जिल्हा पणन अधिकारी विलास सोमारे यांनी कळविले आहे. *****

गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Image
गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे · रस्ते सुरक्षा समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा लातूर, दि. २५ : अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असून, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आगामी गणेशोत्सवात वाहतूक नियम जनजागृती मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ते सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. थोरात, कार्यकारी अभियंता देवेंद्र नीळकंठ, अलका डाके, गणेश क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव...

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य २६ ऑगस्ट रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य २६ ऑगस्ट रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर लातूर, दि. २२ (जिमाका): महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे हे मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी लातूर जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. प्रा. डॉ. काळे यांच्या उपस्थितीत २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे १ ऑगस्ट २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ओबीसी, एसबीसी, व्ही.जे., एनटी., एसईबीसी, ईडब्ल्यूएस या संवर्गातील वितरीत केलेली जात प्रमाणपत्रे व जात वैधता प्रमाणपत्रे यांचा आढावा, तसेच भटक्या विमुक्त आश्रमशाळांबाबत आढावा बैठक होईल. दुपारी १२.३० वाजता त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे लातूर जिल्हा भगीरथ गवंडी समाज या संघटनेचे व लोकप्रतिनिधींच्या निवेदनानुसार सगर/बेलदार जात समूहाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी चर्चा व सुनावणी होईल. दुपारी २ वाजता ते पुण्याकडे रवाना होतील. ****

लातूर शहरात मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथके गठीत

लातूर शहरात मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथके गठीत लातूर, दि. 22 (जिमाका): मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सण, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, समारंभप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीसाठी पथके गठीत करण्यात आली आहेत. ही पथके लातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन व महसूल मंडळ हद्दीमधील मंडप, पेंडॉल तपासणी करणार असल्याची माहिती लातूरच्या उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी दिली. ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये पोलीस निरीक्षक अरविंद पवार (दूरध्वनी क्र. 02382-246211, भ्रमणध्वनी क्र. 9823226423, ई-मेल आयडी pslaturrular@gmail.com), बाभळगावचे मंडळ अधिकारी सुनिल लाडके (भ्रमणध्वनी क्र. 8308376111, ई-मेल आयडी- ladkesd2801@gmail.com), बाभळगाव येथील तलाठी गोपाळ धुमाळ (भ्रमणध्वनी क्र. 9960737123, ई-मेल आयडी laturtahsildar@gmail.com) यांचा समावेश असणार आहे. मुरुड पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजागरे (भ्रमणध्वनी क्र. 8975359100, ई-मेल आयडी- psmurud405@gamil.com), मुरुड येथील मंडळ अधिकारी दिपक भुजबळ (भ्रमणध्वनी क्र. 928...

लातूरजिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

*लातूरजिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी*  लातूर, दि. 22 (जिमाका) :  कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितताअबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम1951 च्या कलम 37 (1) व (3)  नुसार  संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी वजमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 23 ऑगस्ट,2025 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते  6 सप्टेंबर,2025 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी  काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले,दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी  वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरतायेणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवाइतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवातयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करतायेणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळेसभ्यता अगर न...

लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज अंतिम प्रभाग रचना होणार जाहीर

लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज अंतिम प्रभाग रचना होणार जाहीर लातूर, दि. २१ (जिमाका): राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या १२ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागा आणि त्याअंतर्गत सर्व पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी निवडणूक प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार २२ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. ही अधिसूचना लातूर जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, सर्व तहसील कार्यालये आणि सर्व पंचायत समिती कार्यालयांतील फलकांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध असेल. सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे, असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे. *****

लातूर जिल्ह्यात युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध; टंचाई नाही

लातूर जिल्ह्यात युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध; टंचाई नाही लातूर, दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात सध्या 34 हजार 305 मे. टन रासायनिक खते उपलब्ध असून, यापैकी 546 कृषी सेवा केंद्रांमध्ये 7 हजार 17 मे. टन युरिया खत उपलब्ध आहे. यामुळे जिल्ह्यात खतांची टंचाई नाही. शेतकऱ्यांना खतसाठ्याची माहिती https://adozplatur.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding.html?m=1 या ब्लॉगवर दररोज अद्ययावत केली जाते. सोयाबीन पिकाचे जिल्ह्यात 4 लाख 85 हजार 182 हेक्टर क्षेत्र असून, हे पीक फुले लागणे ते शेंगा भरणे अवस्थेत आहे, त्यामुळे युरियाची गरज नाही. युरियाच्या वाढीव दराने विक्री किंवा टंचाईबाबत कोणतीही लिखित तक्रार नाही. जिल्ह्यात 713 कृषी सेवा केंद्रांची निरीक्षकांमार्फत तपासणी झाली असून, अनियमितता आढळलेल्या 15 दुकानांचे परवाने काही कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहेत. तसेच एका दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. वाढीव दराने विक्री किंवा सक्तीच्या लिंकिंगच्या तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विभाग किंव...

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन लातूर, दि. 20 (जिमाका): राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲङ आशिष शेलार यांनी केली. महोत्सवांतर्गत, महाराष्ट्र राजय उत्कृष्ट सार्वजिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका या तीनही स्तरांवर होणार आहे. या स्पर्धेचे अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या https://www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे ऑनलाईन स्वरुपात स्वीकारले जाणार आहे. स्पर्धेचे अर्ज स्विकारण्याची अंतिम 25 ऑगस्ट, 2025 असून, ही स्पर्धा विनामूल्य आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. विजेत्या मंडळांना तालुकास्तरावर एक, जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे. यासोबतच, महाराष्ट्रातील घरगुती गणपतीचे दर्शन, सार्वजनिक गणपतीचे दर्शन व विविध प्रसिध्द गणेश मंदिरातील ...

आर्टीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण नोंदणीला २८ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

आर्टीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण नोंदणीला २८ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ लातूर, दि. २० : अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (आर्टी) राज्यातील मातंग व त्यातील तत्सम जातीच्या उमेदवारांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरिता अनिवासी पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली आहे. मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग- म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा समाजातील जे उमेदवार १२ वी आणि पदवीधर परीक्षा उत्तीर्ण आहेत अशा पात्र उमेदवारांनी https://barticet.in/ARTI या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन स्वरुपात अर्ज करावेत. २९ ते ३० ऑगस्ट २०२५ या दोन दिवसात उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जात दुरुस्ती व प्रिंट काढण्यासाठी देण्यात आले आहेत. त्यानंतर या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सामयिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test-CET) घेऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनामार्फत सर्वंकष धोरण निश्च‍ित करण्यात...

इस्त्राईलमध्ये होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हरसाठी रोजगार संधी

इस्त्राईलमध्ये होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हरसाठी रोजगार संधी लातूर, दि. 20 (जिमाका): राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ हे वेबपोर्टल सुरू केले आहे. याअंतर्गत इस्त्राईलमध्ये होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्ससाठी रोजगार संधी उपलब्ध आहे, ज्यामध्ये मासिक 1 लाख 61 हजार 586 रुपये वेतन मिळेल. या पदासाठी जनरल ड्युटी असिस्टंट, ए.एन.एम., जी.एन.एम., बी.एस्सी. नर्सिंग, पोस्ट नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट किंवा मिडवाइफरी क्षेत्रातील किमान 990 तासांचा (ऑन जॉब ट्रेनिंगसह) अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. इच्छुकांनी https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर कार्यविवरण, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती आणि अर्ज प्रक्रियेची माहिती घ्यावी.जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी केले आहे. ****

लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांकडून मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज मागविले

लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांकडून मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज मागविले लातूर, दि. 20 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च 2017 च्या शासन निर्णयानुसार, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने पुरवण्यासाठी योजना कार्यान्वित आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सन 2025-26 साठी लातूर जिल्ह्यातील पात्र बचत गटांना या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. इच्छुक बचत गटांनी अर्ज भरून 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, लातूर यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे त्यांनी कळविले आहे. *****

लातूर जिल्ह्यात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव; बैलपोळा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे प्रशासनाचे आवाहन

लातूर जिल्ह्यात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव; बैलपोळा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे प्रशासनाचे आवाहन लातूर, दि. २० : जिल्ह्यात सध्या लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, येत्या २२ ऑगस्ट रोजी साजरा होणारा बैलपोळा उत्सव साध्या आणि सुरक्षित पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येत असून, पशुपालकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सद्यस्थिती अहवालानुसार, विविध तालुक्यांमध्ये एकूण ४११ जनावरे या रोगाने बाधित झाली आहेत. त्यापैकी २०० जनावरे उपचारानंतर पूर्णपणे बरी झाली आहेत, तर १७९ जनावरे अद्याप उपचाराधीन आहेत. दुर्दैवाने, ३२ जनावरांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. हा रोग जनावरांच्या त्वचेवर गाठी निर्माण करतो, ज्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो आणि त्यांचे आरोग्य धोक्यात येते. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध कठोर उपाययोजना राबवल्या जात आहेत, ज्यात बाधित क्षेत्रांमध्ये जनाव...

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद शांततेत साजरे करून सामाजिक एकोपा जपूया ! - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद शांततेत साजरे करून सामाजिक एकोपा जपूया ! - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे · शांतता समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा लातूर, दि. २० : आपल्या जिल्ह्याची शांतताप्रिय जिल्हा अशी ओळख आहे. सर्वधर्मीय सण, उत्सव आतापर्यंत उत्साहाने आणि सामाजिक सलोखा जपत साजरे झाले आहेत. हीच वैभवशाली परंपरा कायम ठेवत यंदाचा पोळा, गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. दयानंद सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे ‘माझं लातूर, सुरक्षित लातूर’ हा अभिनव उपक्रम राबवला जाणार असून, यात जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर महानगरपालिका आयुक्त मानसी, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते. जिल्हाधि...

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची पूरग्रस्त गावांना भेट; नुकसानीचे पंचनामे, उपाययोजनांचा घेतला आढावा

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची पूरग्रस्त गावांना भेट; नुकसानीचे पंचनामे, उपाययोजनांचा घेतला आढावा लातूर, दि. 20 : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज उदगीर तालुक्यातील पूरग्रस्त मौजे बोरगाव बुद्रुक, धडकनाळ आणि टाकळी या गावांना भेट देऊन पूरग्रस्त भागातील शेती, घरांचे नुकसान आणि इतर बाधित क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाची बैठक घेऊन पंचनामे, उपाययोजना आणि नागरिकांच्या आरोग्य सुविधांबाबत आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी बोरगाव येथील तानाजी धोंडीबा सुभाने, हनुमंत अर्जुन सुभाने आणि रमेश अर्जुन सुभाने यांच्या घरांना भेट देऊन पाहणी केली, जिथे तीन ते चार फूट पाणी साचले होते. त्यांनी गावकऱ्यांना प्रशासनाच्या सर्व उपाययोजनांची माहिती देऊन आश्वस्त केले. पीक नुकसानी, मृत जनावरे, पडझड झालेली घरे आणि इतर नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान त्वरित वितरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बोरगाव आणि धडकनाळ गावातील विद्युत पुरवठा आजच सुरळीत करण्याच्या सूचना देतानाच, गावात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरणार नाही यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उ...

महाराष्ट्रात उद्योगांना चालना देण्यासाठी ‘मैत्री’ कायदा ! एकल खिडकी योजनेमुळे उद्योजकांना परवानग्या मिळणार जलदगतीने

महाराष्ट्रात उद्योगांना चालना देण्यासाठी ‘मैत्री’ कायदा ! एकल खिडकी योजनेमुळे उद्योजकांना परवानग्या मिळणार जलदगतीने लातूर, दि. १९ (जिमाका): महाराष्ट्राला देशातील आणि जगातील गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनवण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा’ अर्थात ‘मैत्री’ कायदा-२०२३ लागू केला आहे. हा कायदा उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी किंवा त्यांचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सरकारी परवानग्या आणि सेवा एकाच ठिकाणी जलदगतीने उपलब्ध करून देतो. ‘मैत्री’ कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये: एकल खिडकी योजना: उद्योजकांना आता विविध सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. सर्व परवानग्यांसाठी अर्ज करणे आणि त्यांची स्थिती तपासणे एकाच ऑनलाइन पोर्टलवर शक्य होईल. यामुळे वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होईल. वेळेचे बंधन: प्रत्येक परवानगीसाठी निश्चित कालावधी ठरविण्यात आला आहे. जर संबंधित विभागाने या कालावधीत मंजुरी दिली नाही, तर अर्ज स्वयंचलितपणे मंजूर समजला जाईल. पारदर्शकता आणि वेग: ऑनलाइन प्रक्रियेमुळे कामात पारदर्शकता येईल आणि अर्जाची स्थिती प्रत्येक टप्प्यावर तपा...

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन · ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५ लातूर, दि. १९ (जिमाका): महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या लातूर जिल्हा कार्यालयामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजने अंतर्गत ९०, बीज भांडवल योजने अंतर्गत ९० आणि थेट कर्ज योजने अंतर्गत ३८ कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत https://mahadisha.mpbcdc.in/schemes या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे. अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, व्यवसायाचे परवाना (लायसन्स) आदी कागदपत्रांची छायांकित प्रत सादर करावी. या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुकांनी विहित...

माजी सैनिकांनी ॲडव्हेंचर ट्रेनिंगची माहिती सादर करण्याचे आवाहन २२ ऑगस्टपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधावा

माजी सैनिकांनी ॲडव्हेंचर ट्रेनिंगची माहिती सादर करण्याचे आवाहन २२ ऑगस्टपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधावा लातूर, दि. १९ (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी ॲडव्हेंचर ट्रेनिंग पूर्ण केलेली माहिती सादर करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. यामध्ये बेसिक माउंटेनियरिंग कोर्स, ॲडव्हान्स्ड माउंटेनियरिंग कोर्स, पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग, स्विमिंग आदी क्षेत्रांतील तज्ज्ञता असलेल्या माजी सैनिकांचा समावेश आहे. यानुसार, संबंधित माजी सैनिकांनी आपले डिस्चार्ज बुक, ओळखपत्र आणि ॲडव्हेंचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण केल्याची कागदपत्रे घेऊन लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात २२ ऑगस्ट २०२५ पर्यंत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे. *****

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 8.3 मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 8.3 मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात 19 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 8.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये रेणापूर तालुक्यात सर्वाधिक 13.1 मिलीमीटर, तर लातूर तालुक्यात सर्वात कमी 4.2 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे - लातूर- 4.2, औसा- 6.5, अहमदपूर- 7.2, निलंगा- 9.9, उदगीर- 9.6, चाकूर- 7.8, रेणापूर- 13.1, देवणी- 11.7, शिरूर अनंतपाळ- 8.7 आणि जळकोट- 6.9 मिलीमीटर. **

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या 06 स्वंयसहाय्यता बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या 06 स्वंयसहाय्यता बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर लातूर, दि. 18: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्यात येतो. या योजनेसाठी सन 2024-2025 आर्थिक वर्षातील पात्र बचत गटाची निवड करण्यासाठी 14 ऑगस्ट, 2025 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे लॉटरी सोडतचे (ड्रॉ) आयोजन करण्यात आले होते. यावेळी छाननी अंती पात्र ठरलेल्या 32 अर्जांमधून 6 बचत गटांची निवड करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने योजनेसाठी सन 2024-2025 या वर्षात 35 अर्ज प्राप्त झालेले होते. या अर्जाच्या छाननी अंती 32 अर्ज पात्र ठरले. शासनामार्फत या योजनेसाठी 06 इतके उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यानुसार पात्र बचत गटांमधून 6 बचत गटांची लॉटरी सोडत (ड्रॉ) पध्दतीने निवड करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेस समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाचे समाज कल्याण अधिकारी विलास केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर सहाय्यक लेखाधिकारी राजेश...

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत विविध बाबींसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत विविध बाबींसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 18 : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळीतधान्य) सन 2025-2026 अंतर्गत फ्लेक्झी घटक या घटकांतर्गत गोदाम बांधकाम, काढणी पश्चात पायाभूत सुविधा या बाबींसाठी तालुकास्तरावर अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकरी उत्पादक संघ अथवा कंपनी, एफपीओ, एफपीसी यांनी त्या त्या पात्र असणाऱ्या बाबीसाठी तालुकास्तरवार ऑफलाईन पध्दतीने 29 ऑगस्ट, 2025 पर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषिअधिकारी एस. व्ही. लाडके यांनी कळविले आहे. गोदाम बांधकाम या बाबी अंतर्गत अन्नधान्य साठवणुकीसाठी 250 मे. टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देय राहील. ही बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जादार शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, एफपीओ, एफपीसी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना तथा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे. काढणी पश्चात...

बीडीएस प्रणालीमुळे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची देयके गतीने अदा करण्यास मदत

बीडीएस प्रणालीमुळे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची देयके गतीने अदा करण्यास मदत लातूर, दि. 18 (जिमाका): शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची देयके विहीत वेळेत पारीत होत आहेत. त्यामुळे ही देयके अदा करण्याची प्रक्रिया गतीने सुरु असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी दिली आहे. दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची देयके कोषागार कार्यालयात सादर करून देयकांची रक्कम पंचायत समितीमार्फत संबंधित केंद्र मुख्याध्यापक यांच्या खात्यावर वर्ग होत होती. त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकामार्फत संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत होती. त्यामुळे भनिनि देयकांची रक्कम प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास काही प्रमाणात विलंब लागत होता. मात्र, सद्यस्थितीत मागील आर्थिक वर्षापासून हे टप्पे कमी करुन सीएमपी प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. भविष्य निर्वाह निधीची दयेके कोषागारात सादर करून देयके मंजूर झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम थेट प्रदान केली...

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्‍याय स्‍वंयम योजनेसाठी २७ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्‍याय स्‍वंयम योजनेसाठी २७ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत लातूर दि. १८ : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्‍या जमाती (भटक्‍या जाती क वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्‍च शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्‍या विद्यार्थ्‍यांसाठी शासनाने सन २०२५-२६ साठी सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्‍याय स्‍वंयम योजना सरू केलेली आहे. प्रति जिल्‍हा ६०० विद्यार्थ्‍यांना या योजनेचा लाभ देण्‍यात येणार आहे. महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्‍ता ४३ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्‍ता ३८ हजार रुपये व तालुक्‍याच्‍या ठिकाणी उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्‍ता विद्यार्थ्‍याच्‍या आधार क्रमांक सलग्न असलेल्‍या बँक खात्‍यात थेट जमा करण्यात येणार आहे. या योजनेतर्गत अर्ज करण्‍याकरीता विद्यार...

इतर मागास वर्ग, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उच्‍च विद्यार्थ्‍यांसाठी वसतिगृह सुविधा

इतर मागास वर्ग, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उच्‍च विद्यार्थ्‍यांसाठी वसतिगृह सुविधा लातूर, दि. १८ : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्‍या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलींचे व मुलांचे १०० विद्यार्थी क्षमतेचे प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांची भोजन, निवास, शैक्षणिक साहित्‍य याची निःशुल्क व्‍यवस्‍था करण्‍यात येते. सन २०२५-२६ साठी रिक्‍त असलेल्‍या जागेवर वसतिगृह प्रवेशासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्‍थळावर अर्ज करण्यासाठी २७ ऑगस्ट, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थी महाराष्‍ट्रचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, तसेच जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्‍याच्या पालकाचे उत्‍पन्‍न २ लाख ५० हजार रुपयापेक्षा जास्‍त नसावे. विद्यार्थ्‍याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्‍था शहराच्‍या तथा तालुक्‍याच्‍या ठिकाणी आहे,...

लातूर जिल्ह्यात 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा घेतला आढावा

Image
लातूर जिल्ह्यात 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा घेतला आढावा सिंचन प्रकल्पांची पाहणी करण्यासह संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना लातूर, दि. 18 : आज, 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांमध्ये लातूर जिल्ह्यातील 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यापैकी काही मंडळांमध्ये 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. तसेच, जिल्ह्यातील 13 लघु सिंचन प्रकल्प आणि साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून, त्यांच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व शासकीय यंत्रणांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी त्यांनी पुढील काही दिवसांत पूरपरिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, लाभक्षेत्र विकास प्रा...

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. 18 (जिमाका): जिल्ह्यात 18 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक 112 मिलीमीटर, तर शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वात कमी 25.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे - लातूर- 27.9, औसा- 26.9, अहमदपूर- 112, निलंगा- 33.8, उदगीर- 82.5, चाकूर- 60.9, रेणापूर- 41.1, देवणी- 47.4, शिरूर अनंतपाळ- 25.3 आणि जळकोट- 34.4 मिलीमीटर. ****

तावरजा, तेरणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

तावरजा, तेरणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा लातूर, दि. १५ (जिमाका) : औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा ७३ टक्के झाला आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुढील दोन-तीन दिवसात पावसाची शक्यता असल्याने हा प्रकल्प निर्धारित धरण पातळीस पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रकल्पात येणारा येवा तावरजा नदीमार्गे सोडावा लागणार आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा धरणाचा पाणीसाठा ८५ टक्के झाला असून धरण निर्धारित धरण पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर धरणात येणारा येवा तेरणा नदीपात्रात सोडावा लागणार आहे. त्यामुळे तावरजा व तेरणा नदीकाठच्या गावांना, शेतकऱ्यांना, नदीकाठी वस्ती करुन राहिलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ, नदीजवळ जावू नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद...

फाळणी दुःखद स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनाचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

Image
सुधारीत फाळणी दुःखद स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनाचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन लातूर, दि. १४ : सन १९४७ मध्ये १४ ऑगस्ट रोजी भारताच्या फाळणीदरम्यान लाखो लोकांनी अनुभवलेल्या दुःख, आघात व विस्थापनाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी १४ ऑगस्ट या दिवशी 'फाळणी दुःखद स्मृती दिन' पाळला जातो. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी गणेश पवार यावेळी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पालकमंत्री श्री. भोसले यांच्यासह सर्व उपस्थितांनी या प्रदर्शनात लावण्यात आलेल्या फाळणी विषयक छायाचित्रे, वृत्तपत्रीय कात्रणे, माहिती फलकांची पाहणी केली.

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा लातूर, दि. १३ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे १४ व १५ ऑगस्ट २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दोन दिवसांत त्यांच्या उपस्थित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री श्री. भोसले यांचे १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६.२५ वाजता लातूर येथे आगमन होईल व लातूर शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी २ वाजता त्यांच्या उपस्थितीत लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विभागांची आढावा बैठक होईल. दुपारी ४ वाजता लातूर शहरातील नांदेड रोडवरील कन्हेरी चौक येथील बाळकृष्ण टॉवर येथे भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला पालकमंत्री उपस्थित राहतील. सायंकाळी ६.१० वाजता त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आ...

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा लातूर जिल्हा दौरा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा लातूर जिल्हा दौरा लातूर, दि. १३ : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांचे १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. सकाळी ११.१५ वाजता गौरी शंकर हॉल, रुक्मिणी मंगल कार्यालय मागे, पोतदार शाळेसमोर, रिंग रोड, लातूर येथे मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतील. दुपारी १२.३० वाजता लातूर येथून धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडीकडे प्रयाण करतील. ***

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर स्वागत

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर स्वागत लातूर, दि. 11 (जिमाका): येथील जिल्हा परिषद परिसरातील लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ग्रंथ भेट देवून त्यांचे स्वागत केले. आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार धनंजय मुंडे, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी आमदार बस्वराज पाटील, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. *****

स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे स्वप्न साकार करू-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे स्वप्न साकार करू-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · लातूर येथे स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण · जिल्हा सामान्य रुग्णालय, शहर विस्तारीत पाणीपुरवठा योजनेला मंजुरी · गुत्ती येथील ५ मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण · जिल्हा परिषदेच्या व्हॉटसअप चॅटबोट उपक्रमाचे उद्घाटन · विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश, लाभ वितरण लातूर, दि. ११ (जिमाका) : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे हे कर्तृत्ववान व संघर्षशील नेतृत्व होते. त्यांची कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री पदापर्यंतची वाटचाल संघर्षमय होती. त्यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी या भागात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी कृष्णा खोऱ्यातील ७ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी यापूर्वीच मंजुरी दिली असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता गोदावरी खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

लातूर जिल्ह्यातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा रेल्वे बोगी कारखान्यातील रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्या-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लातूर जिल्ह्यातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा रेल्वे बोगी कारखान्यातील रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्या-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीला गती देण्याचे निर्देश • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा देण्याबाबत तोडगा काढणार लातूर, दि. ११ (जिमाका): लातूर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रेल्वे बोगी कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. या कारखान्यात लवकरच वंदे भारत रेल्वेच्या बोगींचे उत्पादन सुरू होणार असून, यामुळे सुमारे दहा हजार रोजगार निर्माण होतील. यामध्ये स्थानिक युवक-युवतींना प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या जिल्ह्यातील विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे, आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप,...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लातूर, दि. ११ (विमाका) : लातूर जिल्हा परिषद परिसरात उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याकार्यक्रम प्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार धनंजय मुंडे, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, आमदार संजय केणेकर, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महापालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमस्थळी भारतीय संविधानाची प्रत देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत ...

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 6.2 मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 6.2 मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. 08 (जिमाका): जिल्ह्यात 8 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 6.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये चाकूर तालुक्यात सर्वाधिक 13.6 मिलीमीटर, तर शिरूर अनंता तालुक्यात सर्वात कमी 2.4 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- लातूर- 2.7, औसा- 3.1, अहमदपूर- 9.7, निलंगा- 6.5, उदगीर- 9.7, चाकूर- 13.6, रेणापूर- 3.2, देवणी- 2.9, शिरूर अनंतपाळ- 2.4 आणि जळकोट- 8.9 मिलीमीटर. ***
Image
लातूर येथे 9 ऑगस्टपासून तीन दिवसीय लोकसंगीत महोत्सवाचे आयोजन ▪️ सर्व नागरिकांना विनामूल्य प्रवेश ▪️राज्यातील नामांकित कलाकारांचे सादरीकरण ▪️सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजन लातूर , 07 : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2025 चा लोकसंगीत महोत्सव 9 ते 11 ऑगस्ट, 2025 या कालावधीत लातूर येथील दयानंद सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात राज्यातील विविध गायक कलाकार व कलापथक आपली कला सादर करणार आहेत. शनिवार, 9 ऑगस्ट 2025 रोजी रामानंद उगले, श्रावणी महाजन, विनल देशमुख, कुणाल वराळे यांच्यासह सहकलाकार हे आपली कला सादर करणार आहेत, तर रविवार, 10 ऑगस्ट, 2025 रोजी चैतन्य कुलकर्णी, आसावरी बोधनकर, प्रतीक सोळसे, अनुष्का शिकत...

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित लातूर दि. ०६ : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने २३ मे २०२५ च्या शासन निर्णयानुसार नैसर्गिक वाळूला एम-सॅन्‍ड (कृत्रिम वाळू) पर्याय म्‍हणून विकास करण्‍याचे धोरण निश्चित केले आहे. या धोरणाची अंमलबजावणीची कार्यपद्धती १७ जुलै २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार निश्चित करण्यात आली आहे. शासकीय किंवा सार्वजनिक जमिनीवर खाणपट्टा मंजुरीसाठी कार्यपद्धती • प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय किंवा सार्वजनिक प्राधिकरणाच्या जमिनींची माहिती संकलित केली जाईल. या जमिनींसाठी विविध विभागांचे अभिप्राय घेऊन लिलावासाठी पात्र जमिनींची माहिती “महाखनिज” संगणक प्रणालीवर अपलोड केली जाईल. • महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ च्या नियम ९ अन्वये पाच एकरपर्यंतच्या क्षेत्रासाठी लिलाव प्रक्रिया राबवली जाईल. सर्वोच्च बोली लावणाऱ्या पात्र लिलावधारकाकडून शंभर टक्के एम-सॅन्ड उत्पादन युनिट स्थापण्याचे नोंदणीकृत हमीपत्र घेतले जाईल. हे हमीपत्र रद्द करता येणार नाही. • सर्वोच्च बोली लावणाऱ्या लिलावधारकाने खालील कागदपत्रांसह शासनाच्या पूर्वमान्यते...