मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर स्वागत
लातूर, दि. 11 (जिमाका): येथील जिल्हा परिषद परिसरातील लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ग्रंथ भेट देवून त्यांचे स्वागत केले.
आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार धनंजय मुंडे, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी आमदार बस्वराज पाटील, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
*****
Comments
Post a Comment