चाकूर पोलीस स्टेशनमधील बेवारस वाहनांविषयी आवाहन
चाकूर पोलीस स्टेशनमधील बेवारस वाहनांविषयी आवाहन
लातूर, दि. 7 : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या वार्षिक तपासणीदरम्यान दिलेल्या सूचनांनुसार चाकूर पोलीस स्टेशन अंतर्गत सुमारे पाच वर्षांपासून बेवारस अवस्थेत असलेली वाहने संबंधित वाहन मालकांनी 15 दिवसांच्या आत घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वाहने घेवून न गेल्यास पोलीस अधिनियम 1951 चे कलम 87 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 458 अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी कळविले आहे.
चाकूर पोलीस स्टेशन परिसरात मालवाहू टॅम्पो (फोर्ड कंपनी) - MH 24 J 5867 , तीन चाकी ॲटो (बजाज कंपनी) - MH 24 J 2800, स्कूल बस (टाटा स्टारबस कंपनी) - MH 11 T 9501, कार (टाटा कंपनी) - MH 12 YZ 3886, टेम्पो (आयशर कंपनी) - MH 13 AN 6354 आदी वाहने गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ बेवारस अवस्थेत पडून आहेत. या वाहन मालकांनी ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत चाकूर पोलीस स्टेशन येथे येऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपली वाहने ताब्यात घ्यावीत. अन्यथा, नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे चाकूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment