लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज अंतिम प्रभाग रचना होणार जाहीर
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी
आज अंतिम प्रभाग रचना होणार जाहीर
लातूर, दि. २१ (जिमाका): राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या १२ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागा आणि त्याअंतर्गत सर्व पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी निवडणूक प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार २२ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.
ही अधिसूचना लातूर जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, सर्व तहसील कार्यालये आणि सर्व पंचायत समिती कार्यालयांतील फलकांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध असेल. सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे, असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
*****
Comments
Post a Comment