मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेविषयी ३ सप्टेंबर रोजी माजी सैनिकांसाठी केले जाणार मार्गदर्शन
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेविषयी ३ सप्टेंबर रोजी माजी सैनिकांसाठी केले जाणार मार्गदर्शन
लातूर, दि. २९ (जिमाका): जिल्हा उद्योग केंद्रामार्फत माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी आणि अवलंबितांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ दिला जात आहे. या योजनेंतर्गत विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन आणि आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता लातूर येथील माजी सैनिक मुलांच्या वसतिगृह येथे उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी आणि अवलंबितांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment