फाळणी दुःखद स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनाचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

सुधारीत फाळणी दुःखद स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनाचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन लातूर, दि. १४ : सन १९४७ मध्ये १४ ऑगस्ट रोजी भारताच्या फाळणीदरम्यान लाखो लोकांनी अनुभवलेल्या दुःख, आघात व विस्थापनाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी १४ ऑगस्ट या दिवशी 'फाळणी दुःखद स्मृती दिन' पाळला जातो. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी गणेश पवार यावेळी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पालकमंत्री श्री. भोसले यांच्यासह सर्व उपस्थितांनी या प्रदर्शनात लावण्यात आलेल्या फाळणी विषयक छायाचित्रे, वृत्तपत्रीय कात्रणे, माहिती फलकांची पाहणी केली.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन