पर्जन्यमान/आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील अहवाल जिल्हा लातूर दिनांक 29.08.2025 (सायंकाळी 5 वा.)

पर्जन्यमान/आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील अहवाल जिल्हा लातूर दिनांक 29.08.2025 (सायंकाळी 5 वा.) दिनांक 29/08/2025 रोजी लातूर जिल्ह्यामध्ये सरासरी 91.8 मिमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरी 189.6 मिमी पर्जन्यमानाच्या तुलनेत प्रत्याक्षात 336.0 मिमी पाऊस झाला आहे. दि. 1 जूनपासून आतापर्यंतचा पाऊस अपेक्षित सरासरी 511.9 मिमी पर्जन्यमानाच्या तुलनेत 107.3 टक्के म्हणजेच 549.2 मिमी इतका पाऊस झालेला आहे. लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी (जून ते सप्टेंबर) 706.0 मिमीच्या तुलनेत 77.8% इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दि.29.08.2025 रोजी 60 पैकी 36 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिवीत हानी- निरंक पशुहानी - मौजे धसवाडी तालुका अहमदपूर येथील शेतकरी लक्ष्मण नामदेव गोजेगावकर याची गाय पावसामुळे नाल्यात आलेल्या पुरामुळे मयत झाली आहे. मौजे, हाळी तालुका उदगीर येथे श्री. खाजामैनोद्दीन तांबोळी यांच्या शेतातील गोठ्यात पाणी शिरुन 2 गाभण म्हशी व देवणी जातीची। गाभण गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मौ. गुत्ती ता. जळकोट येथील श्री हुलाजी व्यंकट केंद्रे यांच्या 605 कोंबड्या पावसामुळे दगवल्या. गाव मौजे शेळगी येथील पंढरीनाथ सोपान गुंडरे यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडून रात्री दोन गाय, एक म्हैस व एक वासरू असे एकूण 4 जनावरे दगावली आहेत. मौजे एंडी येथील शेतकरी चंद्रकांत बसवंतराव कोल्हाळे यांचे शेतात मध्यरात्री तीनच्या सुमारास विज पडून बैल दगावला आहे व इतर ठिकाणी 10 दुभती जनावरे, 1 बैल व वासरू 6 अशी मयत झाले आहेत. मौ. बामणी ता. रेणापूर येथील बाबू मोहम्मद मुजावर या शेतकऱ्याची एक बकरी अंदाजे वय आठ महिने रेणा नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेली आहे एकूण पशुहानी संख्या 27 (गाय/ म्हशी 17, 7 वासरू, 2 बैल, 1 बकरी) (605 कोंबडया) घरपडझड- मौ. दैठणा ता. शिरूर अनंतपाळ येथील श्री व्यंकट शंकर सामनगावे यांच्या राहत्या घराची भिंत संततधार पावसाने पडली आहे. मौज वाडीशेडोळ ता. निलंगा येथील नसरोदीन सिकंदर शेख, वजीर बंदेअली शेख यांच्या घराची भिंत संततधार पावसामुळे पडली आहे, मौजे तगरखेडा येथील मिलिंद कुंडलिक सूर्यवंशी यांच्या घराची भिंत संततधार पावसामुळे पडली आहे. मौ. चिंचोली भंगार ता. निलंगा येथील शिवलिंग काशिनाथ मेंडूळे यांचे राहते घर पडले आहे मौजे औराद शहाजानी तालुका निलंगा नागनाथ संग्रामप्पा मरळे घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. मौ महापूर येथील बापूराव मंजुळबुवा चौरंगनाथ गोपीनाथ जोगी यांची पावसाच्या पाण्याने भिंत कोसळून नुकसान झाले आहे. लातूर येथील अंशतः पडझड झालेल्या घरांची संख्या 7. अहमदपूर येथील 2 व इतर ठिकाणी असे एकूण 116 घरांची पडझड झाली आहे. (एकूण पडझड झालेल्या घराची संख्या-116) सुरक्षित ठिकाणी स्थलांतर- चापोली ता. चाकुर गावामध्ये 20 ते 22 घरांमध्ये पाणी शिरून संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झालेले आहे. यापैकी तीन कुटुंबांना जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे स्थलांतरित करण्यात आलेले असून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिरूर अनंतपाळ येथील पोलिस स्टेशनच्या बाजूस आलेल्या मसणजोगी वस्तीमध्ये पाणी आल्यामुळे तेथील अंदाजे 50 व्यक्तींना गावातील अभ्यासिकेमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांची जेवणाची व निवासाची व्यवस्था नगर पंचायत मार्फत करण्यात आली आहे. तसेच वॉर्ड नंबर 17 मधील 15 ते 20 व्यक्तींना विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांचीही जेवणाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. शोध व बचाव कार्य- आपत्ती व्यवस्थापनाच्या स्थानिक पथकामार्फत 12 लोकांची व 30 जनावरांची सुखरूप सुटका 1. शिरूर अनंतपाळ मधील नदीच्या पलीकडं शेडमध्ये पाच लोक अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. 2. मौजे काळेगाव तालुका अहमदपूर येथील साठवण तलावाच्या सांडव्यावर एक व्यक्ती अडकला होता आपत्ती व्यवस्थापनाच्या स्थानिक पथकामार्फत त्याची सुटका करण्यात आली आहे. 3. शिरूर अनंतपाळ येथील घरणी नदीवरील पुलाचे बांधकाम करणारे 3 मजूर पाण्यात अडकले होते त्यांना स्थानिक पथकाच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. 4. मौजे माकणी येथे गावाजवळील पुलावरून जात असताना दौलत गोपाळ डोंगरगावे यांचा पाण्यात तोल जाऊन वाहत असताना गावकऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. त्यांना थोडे मार लागल्याने साईकृपा हॉस्पिटल शिरूर ताजबंद येथे उपचार चालू आहे. 5. मौजे मुशिराबाद येथील हानमंत पांडुरंग मतलाकुटे यांच्या घराची भिंत कोसळून त्यांची मुलगी सारिका गणेश पिनाटे ही जखमी झाली असून त्यांना उपचारार्थ यशोदा हॉस्पिटल लातूर येथे दाखल केले आहे. 6. कोपरा साठवण तलाव तालुका अहमदपूर सांडव्याहुन एका व्यक्तीने उडी मारली होती व झाडाला लटकले होते. झाडाला लटकलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 7. मौजे शेंद तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील पुरात अडकलेल्या 30 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. * प्रभावित झालेल्या रस्त्याची / पुलांची माहिती खालील मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनांची वाहतूक तात्पूरती बंद करण्यात आली आहे. 1. माणकेश्वर - उदगीर मार्गावरील इंद्रराळ येथील पुलावरून पाणी वाहत आहे. 2. बोटकुळ निलंगा मार्गावर पुलावरून पाणी वाहत आहे. 3. अतनूर येथील पुलावरून पाणी वाहत आहे, उदगीर-अतनूर-बाराळी रस्ता बंद आहे. 4. उटी व अलमला रस्त्यावर पुलावरून पाणी जात असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक बंद आहे. 5. दैठणा येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अजनी ते उदगीर वाहतूक बंद आहे. 6. औसा ते हसलगन रोडवर जवळगावाडी येथे पुलावरून पाणी जात असल्यामुळे सदर मार्गावर वाहतूक बंद आहे. 7. एकंबा येथील पुलावर पाणी आल्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक बंद आहे. 8. घडकनाळ बोरगाव च्या पुलावर पाणी आल्यामुळे उदगीर ते देगलूर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. 9. मौ शेळगाव ता. चाकूर येथे तिरु नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे 10. सिंगनाळ ता. निलंगा येथील ओढ्‌याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने सिंगनाळ येथील वाहतूक बंद आहे 11. बोरसांगवी गावचा संपर्क तुटला नदी वरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद आहे 12. उस्तुरी ते टाकळी ता. निलंगा येथील ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने उस्तुरी येथील वाहतूक बंद आहे 13. हालसी (तु.) वरून तुगाव जाणाऱ्या रस्त्यावर नदीचे पाणी आल्यामुळे रस्ता बंद आहे. 14. हासोरी खुर्द ते हासोरी बु ता. निलंगा जाणाऱ्या रस्त्यावर पुलावरून पाणी वाहत आहे रस्ता बंद आहे 15. मौजे शेणकुड़ येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे बरेच दिवसापासून हा मार्ग बंद झाला आहे पण ढालेगाव आणि सांगवी सु. असे दोन पर्यायी मार्ग चालू आहेत.. 16. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नळेगाव सज्जातील हटकरवाडी एक या गावातील नदीला आलेल्या पुरामुळे हटकरवाडी ते नळेगाव हा रस्ता बंद झालेला असून पुलाच्या वरून दोन ते तीन फूट पाणी वाहत आहे.. 17. नळेगाव ते लिंबाळवाडी रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असून सदर रस्ता सुद्धा बंद झालेला आहे.. 18. शिरूर अनंतपाळ ते हणमंतवाडी जाणारा पूल पाण्याखाली गेला आहे 19. मौजे शिरूर अनंतपाळ ते नागेवाडी जाणारा घरणी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. 20. नळेगाव ते लिंबाळवाडी रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असून सदर रस्ता सुद्धा बंद झालेला आहे.. 21. औराद - वांजरखेडा नदीपात्रातील पुलावरून पाणी चाहत आहे त्यामुळे रस्ता चंद झाला आहे 22. सोनखेड ता. निलंगा किटीअवेर पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे रस्ता बंद झाला आहे 23. औराद शहाजानी ता. निलंगा ते भालकी जाणाऱ्या रस्त्यावर भातंबरा गावात जवळ नदीचे पाणी रस्त्यावर वाहत असलेल्यामुळे रस्ता बंद झाला आहे 24. चिलवंतवाडी ते कासार बालकुंद रस्त्यावर पाणी असल्यामुळे रस्ता बंद आहे 25. शिरूर अनंतपाळ जवळ घरणी नदीला पाणी आल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्गावरील कानेगाव व टाकळी बसेस नळेगाव येरोळमोड मोड मार्गे मार्गस्थ करण्याचे सुचना आहेत. 26. वरवंटी ते शिंदगी च्या मधील पुलावरून पाणी जात असल्यामुळे रस्ता बंद आहे 27. लातूर - निजामाबाद मार्गावर नरसी येथे नदीपुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद आहे. 28. उदगीर निझामाबाद मार्ग मुखेड नियत नरसी व बिलोली च्या मध्ये तळणी येथे रस्त्यावर पाणी आल्याने सदरची वाहतूक बंद आहे. 29. शिरूर अनंतपाळ ते येरोळ-उदगीर जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत असलेल्यामुळे रस्ता बंद झाला आहे 30. शिरूर अनंतपाळ ते हणमंतवाडी जाणारा पुल पाण्याखाली गेला आहे रस्ता बंद झाला आहे 31. शिरशी तालुका लातूर सरहद ते धानोरा ते ईजिमा-115 रस्त्यावरील साखळी क्रमांक 0/700 येथील नळकांडी पुलाजवळ भराव वाहून गेल्यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक होऊन रस्ता बंद आहे. 32. औसा तालुका मौजे पोमादेवी जवळगा ते संक्राळ रस्त्याच्या पुलावर पुराचे पाणी आलेले आहे, वाहतुकीसाठी रस्ता बंद केलेला आहे. 33. जळकोट तालुक्यातील डोरसंगवी आणि धनगरवाडी या गावाचा लाळी बु पुलावरून पाणी जात असल्याने रस्ता बंद केलेला आहे 34. नावंदी ते उदगीर ग्रामरस्तावरील ओढ्याला पूर आल्याने सध्या बंद करण्यात आला आहे. 35. मौ. शेडोळ ता, निलंगा ओढ्याच्या पाण्यामुळे रस्ता बंद असून योग्य ती दक्षता घेण्याचद्दल गावाकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 36. निलंगा तालुक्यातील मौ. शिवणी को. ते आनंदवाडी शि. को. येथील ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने मौ. शिवणी को. ते आनंदवाडी शि. को. येथील वाहतूक बंद आहे. 37. हालसी हा, ओढ्यावरून पाणी जात आहे त्यामुळे हालसी ते हातरगा रस्ता बंद आहे. 38. उजलंब रोहिना प्रतिमा-३२ या रस्त्यावर साखळी क्रमांक ८/२०० वरील नळकांडी पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. 39. जाणवळ ते शिवनखेड ता. चाकूर प्रजिमा-१७ या रस्त्यावर साखळी क्रमांक २५/२०० वरील नळकांडी पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे 40. घरणी ते अंबुलगा ता. चाकूर रस्त्यावर शृंगारे च्या शेता जवळ असलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली आहे 41. बुधोडा ते हसेगाव वाडी ता. औसा रस्त्यावरील पुलावर पाणी आलेले असल्याने वाहतूक बंद केली आहे 42. जवळगा ते साकोळ ता. शिरूर अनंतपाळ रस्ता बंद झालेला आहे 43. देवणी - लासोना ता. देवणी रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असल्याने बंद 44. पंढरपूर - दावणगाव ता. देवणी रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असल्याने रस्ता बंद 45. विजयनगर- लासोना ता. देवणी रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असल्याने रस्ता बंद 46. मौजे शेंद ता. निलंगा ते हलकी जाणारा रस्ता वाहतुकीस बंद झालेला आहे 47. सार्वजनिक बांधकाम उपविभाग चाकुर अंतर्गत चाकूर उजळंब येरोळमोड प्रजिमा-33 या रस्त्यावर साखळी क्रमांक 1/800 वरील नळकांडी पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. 48. बाबळगाव ते बोरी जाणाऱ्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस ग्राम महसूल अधिकारी व पोलीस पाटील यांना थांबवण्यात आलेले आहे. 49. बिंदगीहाळ लातूर रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. 50. राज्य महामार्ग 238 निलंगा उदगीर घनेगाव येथील पुलावरून पाणी जात असल्याने रस्ता बंद आहे 51. शिऊर येथील मांजरा नदीवरील पूलाच्या वरून पाणी वाहू लागल्याने निलंगा ते उदगीर रस्ता तूर्तास बंद करण्यात आलेला आहे. 52. मोजे तगरखेडा येथून औरादकडे जाणारे दोन्ही रस्ते नदीच्या बॅकवॉटरमुळे बंद आहेत. पर्यायी रस्ता हालसी तु.- तांबरवाडी- हलगरा ते बिदर रोड असा चालू आहे. 53. गिरकचाळ ता. निलंगा येथील नदी पुलावरून पाणी आलेले आहे. 54. तिरुका ता. जळकोट येथे तिरु नदीवरील पुलावरून वरून पाणी जात आहे 55. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आजही 8 ठिकाणी पुलावरून पाणी जात असल्यामुळे रस्ते बंद आहेत. हणमंतवाडी, नागेवाडी, शिरूर अनंतपाळ उदगीर रोड, साकोळ घुग्गी जाणारा रस्ता, हिसामाबाद ते बिबराळ रस्ता, शिरूर अनंतपाळ ते होनमाळ रस्ता शिरूर अनंतपाळ ते निलंगा जाणारा हिसामाबाद पुलावरील रस्ता इत्यादी रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. 56. धनेगाव येथे पुलावरून पाणी जात असल्याने निलंगा-उदगीर रोडवरील वाहतूक बंद झाली आहे 57. उजेड येथील पुलावरून पाणी जात असल्यामुळे शिरूर अनंतपाळ रोडवरील वाहतूक बंद झाली आहे 58. धनेगाव येथील पुलावरूनच पाणी वाहत असल्याने उदगीर- निलंगा वाहतूक बंद झाली आहे. 59. आंबेसांगवी, ता. लोहा येथील पुलावर पाणी आले आहे. लोहा ते नांदेड जाणारी, वाहतूक बंद झाली आहे. अन्वये, उदगीर-नांदेड बस सेवा बंद आहे. 60. गिरकसाळ नदीवर पाणी आल्यामुळे मेहकर- लातूर मार्गे निटूर वाहतूक बंद आहे. 61. मुरंबी ते सुगाव मार्गावर पुलाच्या दोन्ही बाजुने पाणी रोडवर आल्याने बाहतुक बंद आहे 62. बोरी-मुशिराबाद मार्गावर बोरी गावाच्या पलीकडे ओढ्‌याचे पाणी पुलावरून वाहत आहे, वाहतूक बंद 63. लातूर - नदिड मार्गावर आंबेसांगवी येथे नदीपुलावर पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद आहे. 64. राज्य महामार्ग 238 निलंगा उदगीर धनेगाव येथील पुलावरून पाणी जात असल्याने रस्ता बंद करण्यात आलेला आहे 65. नांदेडकडे जाणाऱ्या सर्व बसेस लोहा येथे थांबवण्यात आले आहे 66. घनसरगाव च्या पुढे रस्ता खचलेला आहे त्यामुळे त्या मार्गावरील गाड्या जाऊ शकत नाहीत त्यामुळे त्या मार्गावरील गाड्‌या सध्या बंद केलेले आहेत. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन