सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
लातूर, दि. 26 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची 13 व मुलींची 12 अशी एकूण 25 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांची सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होत असून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी https://hmas.mahait.org या लिंकचा वापर करुन विद्यार्थी वसतिगृहासाठी प्रवेश अर्ज भरु शकतात. या वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी 15 सप्टेंबर, 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
तरी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी स्थानिक गृहप्रमुख, गृहपाल यांचेकडे संपर्क साधून विहित वेळेत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावेत, असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी आवाहन केले आहे.
****
Comments
Post a Comment