बीडीएस प्रणालीमुळे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची देयके गतीने अदा करण्यास मदत
बीडीएस प्रणालीमुळे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची
भविष्य निर्वाह निधीची देयके गतीने अदा करण्यास मदत
लातूर, दि. 18 (जिमाका): शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची देयके विहीत वेळेत पारीत होत आहेत. त्यामुळे ही देयके अदा करण्याची प्रक्रिया गतीने सुरु असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी दिली आहे.
दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची देयके कोषागार कार्यालयात सादर करून देयकांची रक्कम पंचायत समितीमार्फत संबंधित केंद्र मुख्याध्यापक यांच्या खात्यावर वर्ग होत होती. त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकामार्फत संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत होती. त्यामुळे भनिनि देयकांची रक्कम प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास काही प्रमाणात विलंब लागत होता.
मात्र, सद्यस्थितीत मागील आर्थिक वर्षापासून हे टप्पे कमी करुन सीएमपी प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. भविष्य निर्वाह निधीची दयेके कोषागारात सादर करून देयके मंजूर झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम थेट प्रदान केली जात आहे. या नवीन प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जलदगतीने प्रदान करणे शक्य झाले आहे. या आर्थिक वर्षात, 1 एप्रिल 2025 पासून अद्यापपर्यंत 648 इतक्या कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह देयके कोणत्याही अडथळा अथवा विलंबाशिवाय पारीत करून त्यांची रक्कम अदा करण्यात आलेली आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment