राष्ट्रीय महामार्ग ते आलमला मार्गावरील पूल दुरुस्त करण्याच्या सूचना
राष्ट्रीय महामार्ग ते आलमला मार्गावरील पूल दुरुस्त करण्याच्या
लातूर दि. 26: औसा-लातूर राष्ट्रीय महामार्ग ते आलमला-उंबडगा रस्त्यावरील पुलाचे काम सुरु असून याठिकाणी तात्पुरता पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या पर्यायी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. सद्यस्थितीत पाण्याच्या प्रवाहाची स्थिती पाहून पर्यायी रस्त्यावरील पूल दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार यांना दिल्या असल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता ए. ए. खैरादी कळविले आहे.
पर्यायी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत आल्यानंतर आलमला गावातील नागरिकांना औसा येथे जाण्यासाठी विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निक कॉलेज मार्गे वॉटर फिल्टर ते औसा, तसेच रामा-२४२ मार्गे औसा व लातूर येथे जाण्यासाठी गंगापूरमार्गे लातूर या मार्गाने वाहतूक करण्याबाबत कळविण्यात आले होते. तसेच उंबडगा गावातील नागरिकांना औसा येथे जाण्यासाठी ग्रामीण मार्ग-१७ मार्गे औसा व लातूर येथे जाण्यासाठी इजिमा-१३३ साबरमती विद्यालय येथून राममा-३६१ मार्गे लातूर जाण्याबत कळविण्यात आले होत. आता पाण्याची सद्यस्थिती लक्षात घेवून तातडीने पर्यायी मार्गावरील पुलाची दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
*****

Comments
Post a Comment