लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांकडून मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज मागविले

लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांकडून मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज मागविले लातूर, दि. 20 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च 2017 च्या शासन निर्णयानुसार, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने पुरवण्यासाठी योजना कार्यान्वित आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सन 2025-26 साठी लातूर जिल्ह्यातील पात्र बचत गटांना या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. इच्छुक बचत गटांनी अर्ज भरून 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, लातूर यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे त्यांनी कळविले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन