महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन · ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५ लातूर, दि. १९ (जिमाका): महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या लातूर जिल्हा कार्यालयामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजने अंतर्गत ९०, बीज भांडवल योजने अंतर्गत ९० आणि थेट कर्ज योजने अंतर्गत ३८ कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत https://mahadisha.mpbcdc.in/schemes या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे. अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, व्यवसायाचे परवाना (लायसन्स) आदी कागदपत्रांची छायांकित प्रत सादर करावी. या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुकांनी विहित कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन