राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत विविध बाबींसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत विविध बाबींसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 18 : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळीतधान्य) सन 2025-2026 अंतर्गत फ्लेक्झी घटक या घटकांतर्गत गोदाम बांधकाम, काढणी पश्चात पायाभूत सुविधा या बाबींसाठी तालुकास्तरावर अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकरी उत्पादक संघ अथवा कंपनी, एफपीओ, एफपीसी यांनी त्या त्या पात्र असणाऱ्या बाबीसाठी तालुकास्तरवार ऑफलाईन पध्दतीने 29 ऑगस्ट, 2025 पर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषिअधिकारी एस. व्ही. लाडके यांनी कळविले आहे. गोदाम बांधकाम या बाबी अंतर्गत अन्नधान्य साठवणुकीसाठी 250 मे. टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देय राहील. ही बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जादार शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, एफपीओ, एफपीसी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना तथा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे. काढणी पश्चात पायाभूत सुविधा या बाबी अंतर्गत तेलबिया संकलन, तेल काढणे आणि तेल उत्पादन कार्यक्षमता वाढविण्यासाठी तेल काढणी युनिट (10 टन क्षमता) आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री आणि उपकरणे, तेलबिया प्रक्रिया युनिट (सोयाबीन व दुय्यम तेलबिया) यासाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के कमाल किंवा 9 लाख 90 हजार रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. लाडके यांनी कळविले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन