पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर, दि. १३ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे १४ व १५ ऑगस्ट २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दोन दिवसांत त्यांच्या उपस्थित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते होणार आहे.
पालकमंत्री श्री. भोसले यांचे १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६.२५ वाजता लातूर येथे आगमन होईल व लातूर शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी २ वाजता त्यांच्या उपस्थितीत लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विभागांची आढावा बैठक होईल. दुपारी ४ वाजता लातूर शहरातील नांदेड रोडवरील कन्हेरी चौक येथील बाळकृष्ण टॉवर येथे भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला पालकमंत्री उपस्थित राहतील. सायंकाळी ६.१० वाजता त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. सकाळी १०.३० वाजता नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय येथे आयोजित महावृक्ष लागवड कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सकाळी ११ वाजता लातूर येथून औसा तालुक्यातील किल्लारीकडे प्रयाण करतील. दुपारी १२ वाजता किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर देवस्थान येथील महाआरतीस उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता किल्लारी येथून साताराकडे प्रयाण करतील.
**
Comments
Post a Comment