इस्त्राईलमध्ये होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हरसाठी रोजगार संधी
इस्त्राईलमध्ये होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हरसाठी रोजगार संधी
लातूर, दि. 20 (जिमाका): राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ हे वेबपोर्टल सुरू केले आहे. याअंतर्गत इस्त्राईलमध्ये होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्ससाठी रोजगार संधी उपलब्ध आहे, ज्यामध्ये मासिक 1 लाख 61 हजार 586 रुपये वेतन मिळेल.
या पदासाठी जनरल ड्युटी असिस्टंट, ए.एन.एम., जी.एन.एम., बी.एस्सी. नर्सिंग, पोस्ट नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट किंवा मिडवाइफरी क्षेत्रातील किमान 990 तासांचा (ऑन जॉब ट्रेनिंगसह) अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. इच्छुकांनी https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर कार्यविवरण, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती आणि अर्ज प्रक्रियेची माहिती घ्यावी.जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment