महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी एकरकमी व्याज सवलत योजनेचा लाभ
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या
थकीत कर्जदारांसाठी एकरकमी व्याज सवलत योजनेचा लाभ
लातूर, दि. 29 (जिमाका): महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने संपूर्ण थकीत कर्ज प्रकरणांसाठी एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याज रकमेवर 50 टक्के सवलत (वन टाइम सेटलमेंट - ओटीएस) देणारी सुधारित योजना 31 मार्च 2026 पर्यंत लागू केली आहे.
या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीदार लाभार्थ्यांनी कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, जात पडताळणी इमारत, जुनी डालडा फॅक्ट्री, शिवनेरी गेटसमोर, गुळ मार्केट, लातूर येथील महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment