सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्‍याय स्‍वंयम योजनेसाठी १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्‍याय स्‍वंयम योजनेसाठी १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत लातूर दि. ०५ : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्‍या जमाती (भटक्‍या जाती क वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्‍च शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्‍या विद्यार्थ्‍यांसाठी शासनाने सन २०२५-२६ साठी सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्‍याय स्‍वंयम योजना सरू केलेली आहे. प्रति जिल्‍हा ६०० विद्यार्थ्‍यांना या योजनेचा लाभ देण्‍यात येणार आहे. महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्‍ता ४३ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्‍ता ३८ हजार रुपये व तालुक्‍याच्‍या ठिकाणी उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्‍ता विद्यार्थ्‍याच्‍या आधार क्रमांक सलग्न असलेल्‍या बँक खात्‍यात थेट जमा करण्यात येणार आहे. या योजनेतर्गत अर्ज करण्‍याकरीता विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्‍ट्रचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, तसेच जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्‍याच्या पालकाचे उत्‍पन्‍न २ लाख ५० हजार रुपयापेक्षा जास्‍त नसावे. विद्यार्थ्‍याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्‍था शहराच्‍या तथा तालुक्‍याच्‍या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी स्‍थानिक रहिवाशी नसावा. विद्यार्थी बारावीनंतरचे उच्‍च शिक्षण घेत असावा. तसेच विद्यार्थ्‍याने इयत्ता बारावीमध्‍ये ६० टक्‍के पेक्षा जास्‍त गुण प्राप्त केलेले असावेत. वरील अटींची पूर्तता करणाऱ्या इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्‍या जमाती (भटक्‍या जाती क वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्‍च शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्‍या उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांनी सावित्रीबाई फुले आधार योजना व धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वंयम योजनेतंर्गत १८ ऑगस्ट, २०२५ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने या संकेतस्‍थळावर https://hmas.mahait.org अर्ज भरावे. अधिक माहितीसाठी निरीक्षक भगवान केंद्रे (मो. न. ९५६११०९०१८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक अभय अटकळ यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन