लातूर शहरात मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथके गठीत

लातूर शहरात मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथके गठीत लातूर, दि. 22 (जिमाका): मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सण, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, समारंभप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीसाठी पथके गठीत करण्यात आली आहेत. ही पथके लातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन व महसूल मंडळ हद्दीमधील मंडप, पेंडॉल तपासणी करणार असल्याची माहिती लातूरच्या उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी दिली. ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये पोलीस निरीक्षक अरविंद पवार (दूरध्वनी क्र. 02382-246211, भ्रमणध्वनी क्र. 9823226423, ई-मेल आयडी pslaturrular@gmail.com), बाभळगावचे मंडळ अधिकारी सुनिल लाडके (भ्रमणध्वनी क्र. 8308376111, ई-मेल आयडी- ladkesd2801@gmail.com), बाभळगाव येथील तलाठी गोपाळ धुमाळ (भ्रमणध्वनी क्र. 9960737123, ई-मेल आयडी laturtahsildar@gmail.com) यांचा समावेश असणार आहे. मुरुड पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजागरे (भ्रमणध्वनी क्र. 8975359100, ई-मेल आयडी- psmurud405@gamil.com), मुरुड येथील मंडळ अधिकारी दिपक भुजबळ (भ्रमणध्वनी क्र. 9284174736, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com), मुरुड येथील तलाठी गोपाळ शिंदे (भ्रमणध्वनी क्र. 9657679672, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com) यांचा समावेश राहील. गातेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये गातेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद केंद्रे (भ्रमणध्वनी क्र. 9850827563, ई-मेल आयडी- psgategaon@gmail.com), गातेगाव मंडळ अधिकारी गणेश शिंगडे (भ्रमणध्वनी क्र. 9595262783, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com), गातेगाव तलाठी अमोल काळे (भ्रमणध्वनी क्र. 9604054067, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com) यांचा समावेश आहे. मंडप तपासणीसाठी गठीत करण्यात आलेली पथके आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मंडप, पेंडॉल यांना भेटी देवून तपासणी करतील, असे लातूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन