इतर मागास वर्ग, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उच्‍च विद्यार्थ्‍यांसाठी वसतिगृह सुविधा

इतर मागास वर्ग, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उच्‍च विद्यार्थ्‍यांसाठी वसतिगृह सुविधा लातूर, दि. ०५ : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्‍या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलींचे व मुलांचे १०० विद्यार्थी क्षमतेचे प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांची भोजन, निवास, शैक्षणिक साहित्‍य याची निःशुल्क व्‍यवस्‍था करण्‍यात येते. सन २०२५-२६ साठी रिक्‍त असलेल्‍या जागेवर वसतिगृह प्रवेशासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्‍थळावर १८ ऑगस्ट, २०२५ पर्यंत ऑनलाईन पध्‍दतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थी महाराष्‍ट्रचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, तसेच जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्‍याच्या पालकाचे उत्‍पन्‍न २ लाख ५० हजार रुपयापेक्षा जास्‍त नसावे. विद्यार्थ्‍याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्‍था शहराच्‍या तथा तालुक्‍याच्‍या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी स्‍थानिक रहिवाशी नसावा. विद्यार्थी बारावीनंतरचे उच्‍च शिक्षण घेत असावा. तसेच विद्यार्थ्‍याने इयत्ता बारावीमध्‍ये ६० टक्‍के पेक्षा जास्‍त गुण प्राप्त केलेले असावेत. वरील अटींची पूर्तता करत असलेल्‍या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्‍या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती वृषाली बडे (भ्रमणध्वनी क्र. ९०२८२६११८३) यांचेशी संपर्क करावा किंवा लातूर येथील मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल तिरुके सुरज (भ्रमणध्वनी क्र. ८३२९४४७४१०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक अभय अटकळ यांनी केलेले आहे. ******

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन