जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या 06 स्वंयसहाय्यता बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर
जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या
06 स्वंयसहाय्यता बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर
लातूर, दि. 18: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्यात येतो. या योजनेसाठी सन 2024-2025 आर्थिक वर्षातील पात्र बचत गटाची निवड करण्यासाठी 14 ऑगस्ट, 2025 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे लॉटरी सोडतचे (ड्रॉ) आयोजन करण्यात आले होते. यावेळी छाननी अंती पात्र ठरलेल्या 32 अर्जांमधून 6 बचत गटांची निवड करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने योजनेसाठी सन 2024-2025 या वर्षात 35 अर्ज प्राप्त झालेले होते. या अर्जाच्या छाननी अंती 32 अर्ज पात्र ठरले. शासनामार्फत या योजनेसाठी 06 इतके उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यानुसार पात्र बचत गटांमधून 6 बचत गटांची लॉटरी सोडत (ड्रॉ) पध्दतीने निवड करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेस समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाचे समाज कल्याण अधिकारी विलास केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर सहाय्यक लेखाधिकारी राजेश सुरकुटलावार, समाज कल्याण निरीक्षक के. टी. मोरे, वरिष्ठ लिपीक डी. के. शिरबतळ, वाय.बी. कावाले, कनिष्ठ लिपीक टी.डी. बायेणे यांनी विशेष परिश्रम घेतले. या योजनेतंर्गत निवड झालेल्या लाभार्थी बचत गटांनी आवश्यक कागदपत्रे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करण्याचे आवाहल समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
Comments
Post a Comment