लातूर जिल्हा कारागृहातील बंदीजण चालविणार उपहारगृह !
लातूर जिल्हा कारागृहातील बंदीजण चालविणार उपहारगृह ! • जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते उद्घाटन • जिल्हास्तरावर मोठ्या स्वरूपातील पहिलाच उपक्रम • बंदीजणांच्या पुनर्वसनासाठी उपक्रम लातूर, दि. 28 (जिमाका) : आपल्या हातून घडलेल्या अपराधाची शिक्षा बंदीजन कारागृहात भोगत असतात. मात्र, ही शिक्षा पूर्ण करून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर समाजात स्वाभिमानाने जगण्याची त्यांची इच्छा असते. शिक्षेचा कालावधी पूर्ण होत आलेल्या अशा बंदीजणांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी लातूर जिल्हा कारागृहामार्फत विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हास्तरावर पहिल्यांदाच लातूर जिल्हा कारागृह येथे बंदीजणांचे मोठ्या स्वरूपातील शृंखला उपहारगृह आणि लाँड्री सुरु करण्यात आली आहे. खुल्या कारागृहातील बंदीजण हे उपहारगृह आणि लाँड्री चालविणार आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते गुरुवारी या शृंखला उपहारगृह आणि लाँड्रीचे उद्घाटन करण्यात आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अमित तिवारी, प्रभारी कारागृह अधीक्षक एस. एस. हिरेकर, तुरुंग अधिकारी मेघा बाहेकर य...