ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी - वर्षा ठाकूर-घुगे

 ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी

-         वर्षा ठाकूर-घुगे

·         समाज कल्याण विभागाच्या विविध समितींची आढावा बैठक

·         मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना द्यावा

·         जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीमध्ये प्रलंबित प्रकरणांचा आढावा


लातूर
, दि. 2(जिमाका) : ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होण्यासाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात मुला-मुलींसाठी प्रत्येकी दोन अशी एकूण चार वसतिगृहे मंजूर असून या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया गतीने पूर्ण करावीअशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समाज कल्याण विभागाच्या विविध समितींच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्तेजिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडीलातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त शुभम क्यातमवारजिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम. पाटीलजिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. कलमे आदी यावेळी उपस्थित होते.

स्थलांतरीत होणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नयेयासाठी शासनाने अशा मुला-मुलींसाठी वसतिगृहे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आणि त्यांच्या पाल्यांची माहिती शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभागाने तातडीने संकलित करून त्यांची नोंदणी करून घ्यावीअसे जिल्हाधिकारी म्हणाल्या. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी केल्या. तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य सुविधाविरंगुळा केंद्राची सुविधा उपलब्ध करून द्यावी. यासोबतच त्यांच्या अनुभवाचा फायदा विधायक कार्यासाठी होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

अनुसूचित जातीअनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत प्रलंबित प्रकरणांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनाजिल्हास्तरीय जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम समितीजिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीमुख्यमंत्री वयोश्री योजना आदी समितींचाही जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. समाज कल्याण सहायक आयुक्त श्री. चिकुर्ते यांनी माहितीचे सादरीकरण केले.

******

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा