लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे आज आतंरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

 लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे आज आतंरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

लातूरदि. 20 (जिमाका) : दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करून योगा विषयी प्रचार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यादृष्टीने सर्व संबंधितांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच ग्रापंचायतीपासून ते जिल्हास्तरापर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पतंजलि योगपीठप्रजापिता ब्रह्मकुमारीसुप्रभात ग्रुपनॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया आदी संस्थांची यामध्ये सहभाग असणार आहे.

'योग-स्वयंम और समाज के लिए योग" ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची टॅगलाईन असून या संकल्पनेवर हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आतंरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून रोजी सकाळी 6 पासून विविध कार्यक्रम होणार आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगेपोलीस अधीक्षक सोमय मुंडेजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

21 जून रोजी सकाळी 6 वाजता योगा विषयक जनजागृतीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी 6.30 पासून जिल्हा क्रीडा संकुल येथे प्राथमिक व्यायाम सुरू होतील. सकाळी 7 ते 7.45 या कालावधीत प्रत्यक्ष योगाभ्यास होईलतरी लातूरकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभागी व्हावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाला येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाला येणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन येथे करण्यात आली आहे. तसेच चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बस डेपो परिसरात करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा