लातूर येथील माजी सैनिक मुलांचे वसतिगृहात अशासकीय सहायक अधीक्षक पदभरती
लातूर येथील माजी सैनिक मुलांचे वसतिगृहात
अशासकीय सहायक अधीक्षक पदभरती
लातूर, दि. 20(जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या आस्थापनेवरील माजी सैनिक मुलांचे वसतिगृह, लातूर येथे अशासकीय सहायक अधिक्षक पद तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन प्रतिमहा रक्कम रुपये 24 हजार 477 प्रमाणे भरण्यात येणार आहे.
या पदासाठी इच्छूक माजी सैनिक उमेदवारांनी आपल्या अर्ज व सर्व मूळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी 28 जून, 2024 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे स्वत: उपस्थित रहावे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment