प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम -2024 पीक विमा प्रस्ताव सादर करताना दक्षता घेण्याचे आवाहन

 प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम -2024

पीक विमा प्रस्ताव सादर करताना दक्षता घेण्याचे आवाहन

लातूरदि. 26 (जिमाका) :  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम -2024 पीक विमा पोर्टल सुरु झाले असून पीक विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 पर्यंत आहे. पीक विमा प्रस्ताव सादर करताना शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा विमा हप्ता भरताना ऑनलाईन सेवा केंद्र (सीएससी), आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधारकार्डसातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपात्रांवर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेलतर त्या शेतकऱ्यांचा प्रथम विमा हप्ता भरुन घ्यावा. तसेच विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांच्या नावामधील दुरुस्ती करून घेण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच शेतकऱ्यांच्या नावात पूर्णत: बदलअसेल तर अशा शेतकऱ्यांचा विमा भरुन घेवू नये. कारण विमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जे बँक खाते लिंक आहेअशा बँक खात्यावरच जमा होणार आहे. त्यामुळे बँकेचे पासबुकआधारकार्ड व सातबारावरील नाव एकच असणे आवश्यक आहे.

तरी सर्व ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी आधारकार्डसातबारा व बँक पासबूक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेलतर त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्वरीत भरुन घेवून शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात त्यांचे नावात दुरुस्त करुन घ्यावीयासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावेअसे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. जाधव यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा