आजी-माजी सैनिक, विधवा यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जुलै महिन्यात तालुकानिहाय बैठकांचे आयोजन
आजी-माजी सैनिक, विधवा यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी
जुलै महिन्यात तालुकानिहाय बैठकांचे आयोजन
लातूर, दि. 25 (जिमाका) : आजी-माजी सैनिक, विधवा व त्यांच्या अवलंबितांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक यांच्या उपस्थितीत तालुकानिहाय बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे.
3 जुलै, 2024 रोजी उदगीर तहसील कार्यालय येथे दुपारी 12 वाजता, 4 जुलै, 2024 रोजी जळकोट तहसील कार्यालय येथे दुपारी 12 वाजता, 9 जुलै, 2024 रोजी अहमदपूर तहसील कार्यालय येथे दुपारी 12 वाजता, 16 जुलै, 2024 रोजी रेणापूर तहसील कार्यालय येथे दुपारी 12 वाजता, 19 जुलै, 2024 रोजी देवणी तहसील कार्यालय येथे दुपारी 12 वाजता, 23 जुलै, 2024 रोजी औसा तहसील कार्यालय येथे दुपारी 12 वाजता, 29 जुलै, 2024 रोजी शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालय येथे दुपारी 12 वाजता आणि 30 जुलै, 2024 रोजी लातूर तहसील कार्यालय येथे दुपारी 12 वाजता या बैठका होणार आहेत. तरी सर्व आजी, माजी सैनिक, विधवा व अवलंबितांनी यावेळी उपस्थित राहून आपल्या अडीअडचणी मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment