इतर मगास बहुजन कल्याण विभागामार्फत उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी वसतिगृह सुविधा
इतर मगास बहुजन कल्याण विभागामार्फत
उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी वसतिगृह सुविधा
· 20 जुलैपर्यंत गृहपाल यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. 25 (जिमाका) : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी सन 2023-24 पासून वसतिगृह सुरू केलेले आहेत. या योजनेतंर्गत लातूर जिल्ह्यात मुला-मुलींची प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेची वसतिगृहे सुरु करण्यात आली असून या वसतिगृहात विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य सुविधा निशुल्क स्वरुपात दिली जाणार आहे. वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक मुला-मुलींनी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल यांच्याकडे 20 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्रचा रहिवाशी असावा, त्याच्याकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पाल्कानाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयेपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी स्थानिक रहिवाशी नसावा. तसेच विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा, अशा विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वीमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
या अटी पूर्ण करणाऱ्या मुलींनी लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल यांच्याकडे येथे अर्ज करावा. अर्जाचा नमुना गृहपाल यांच्याकडे विनामुल्य उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी गृहपाल वृषाली बडे (भ्रमणध्वनी क्र. 9028261183) यांच्याशी संपर्क करावा. तसेच वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मुलांनी लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांच्याकडे अर्ज करावा. अधिक माहितीसाठी गृहपाल पात्रे अनुप (भ्रमणध्वनी क्र. 820878364) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक एस. एन.चिकुर्ते यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment