क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

लातूर, दि. 2(जिमाका) : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याणबंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे शुक्रवार22 जून 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

ना. बनसोडे यांचे 22 जून रोजी सकाळी 6.25 वाजता लातूर रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल व शकुंतला निवासस्थानाकडे प्रयाण करतील व राखीव. सकाळी 9.30 वाजता लातूर येथून मोटारीने जळकोटकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता जळकोट येथील कुणकी रोडवरील तिरुमला मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळकोट शहर व ग्रामीण बुथ मेळावा व कार्यकर्ता संवाद बैठकीस उपस्थित राहतील. सांयकाळी 5 वाजता नांदेड-बिदर रोडवरील श्री श्री डॉ. शंभुलिंग शिवाचार्य नगर येथे श्री सदगुरु हावगी स्वामी शेतमळा येथे श्री श्री ष.ब्र. 108 डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठाचे मठाधिश यांच्या 56 व्या वाढदिवस (गुरुगौरव) सोहळ्यास उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता संतोषीमाता नगर येथे श्री. सिध्देश्वर विनोद मिंचे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 6.30 वाजता गांधी नगर येथे श्री. पंकज कांबळे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सोईनुसार उदगीर येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील. तसेच रात्री 11.30 वाजता लातूर येथून पुणेकडे प्रयाण करतील.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु