लातूर जिल्ह्यात सापडलेल्या बालिकेच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 लातूर जिल्ह्यात सापडलेल्या बालिकेच्या

पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

लातूर, दि. 2(जिमाका) : जिल्ह्यात सापडलेली वैष्णवी ही सहा महिन्याची बालिका लातूर बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार तिला उदगीर तालुक्यातील संधीनिकेतन शिशुगृह एस. टी. कॉलनी येथे 8 फेब्रुवारी 2024 पासून ठेवण्यात आले आहे. ही बालिका ही गोऱ्या वर्णाची आहे.

या बालिकेचे जवळचे कोणी नातेवाईक किंवा आई-वडील असल्यास पुराव्यासह तीस दिवसाच्या आत बाल कल्याण समिती, मुलांचे निरीक्षण गृह, लेबर कॉलनी, लातूर (दूरध्वनी क्र. 02382-243543) किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, पहिला मजला, लातूर (भ्रमणध्वनी क्र. 9822137327) येथे संपर्क साधावा. मुदतीच्या आत संपर्क न साधल्यास या बालिकेचे कोणीही नातेवाईक व आई-वडील हयात नाहीत अथवा ते या बालिकेची जबाबदारी घेण्यास तयार नाहीत, असे गृहीत धरूनदत्तकाची व पुनर्वसनाची कार्यवाही पूर्ण केली जाईल. त्यानंतर कोणाचीही कसलीही तक्रार व आक्षेप चालणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु