लातूर येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत 47 शिकाऊ उमेदवारांची होणार भरती

 लातूर येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत

47 शिकाऊ उमेदवारांची होणार भरती

लातूर, दि. 2(जिमाका) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात सन 2024-2025 या सत्रासाठी वेगवेगळ्या व्यवसायासाठी 47 शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) पदे ऑनलाईन पध्दतीने भरली जाणार आहेत. यामध्ये मोटार मेकॅनिक (यांत्रिक मोटारगाडी एमएमव्ही) 30 पदे, मोटारगाडी साठाजोडारी (एमव्हीबीबी) (शिट मेटल) 7 पदेॲटो इलेक्ट्रीकल तथा इलेक्ट्रीशयन (विजतंत्री) 2 पदे, सांधाता (वेल्डर) (गॅस ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स) 1 पद, पेंटर जनरल 1 पद, मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रीकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स 3 पदे आणि मेकॅनिक रेफ्रिजरेशन ॲन्ड एअर कंडिशनर (प्रतिशन व वातानुकूलिकरण टेक्निशियन) 3 पदे अशी एकूण 47 पदे भरावयाची आहेत.

संबंधित व्यवसायातील दहावी पास, आय.टी.आय (एनसीव्हीटीकिंवा विहित व्यावसायात व्होकेशनल अभ्यासक्रम (एमएसबीएसव्हीईटी)पूर्ण केलेल्या, तसेच ॲटो इलेक्ट्रीकल तथा इलेक्ट्रीशयन (विजतंत्री)सांधाता (वेल्डर) (गॅस ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स), पेंटर जनरलमेकॅनिक ॲटो इलेक्ट्रीकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स यापदांसाठी केवळ आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी सर्वप्रथम एनएपीएस वेब पोर्टलवरील www.apprenticeshipindia.gov.in  या संकेतस्थळावर 27 जून 2024 ते  7 जुलै 2024 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करून एमएसआरटीसी डिव्हिजन लातूर (MSRTC Division Latur) E001172700461 या आस्थापनेसाठी (Establishment) ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी विभागीय कार्यालयात उपलब्ध करून दिलेले छापील अर्ज भरावेत. हे छापील अर्ज लातूर शहरातील जुना रेणापूर नाका येथील राज्य परिवहन विभागीय कार्यालय आस्थापना शाखा येथे शनिवार व रविवार वगळून 8 जुलै 2024 ते 16 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत मिळतील व लगेच स्विकारले जातील. या अर्जासोबत (जीएसटी 18 टक्के सहित) खुल्या प्रवर्गाकरीता 590 रुपये व मागासवर्गीयांसाठी 295रुपयेचा धनादेश किंवा आयपीओ (इंडियन पोस्टल ऑर्डर) एमएसआरटीसी फंड अकाऊंट लातूर (MSRTC Fund Account Latur) या नावाने अर्ज घेतेवेळी सोबत असणे आवश्यक आहे.

27 जून 2024 ते 07 जुलै 2024 या कालावधीनंतर ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असे अर्ज रद्द समजले जातील. अशा उमेदवारांना कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज देण्यात येणार नाही. जे उमेदवार 16 जुलै 2024 रोजी वेळ दुपारी 1 वाजेपर्यंत कार्यालयाचे विहित नमुन्यातील अर्ज सादर करणार नाहीत, त्यांचा शिकाऊ उमेदवार भरतीसाठी विचार केला जाणार नाही, असे लातूर राज्य परिवहन विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु