जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी 28 जून रोजी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

 जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी

28 जून रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह

लातूरदि. 26 (जिमाका) : नोकरीसाठी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्याकारखानेउद्योग समूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी लातूर जिल्हा कौशल्य विकासरोजगार  व उद्योजकतामार्गदर्शन केंद्रातर्फे 28 जून 2024 रोजी रोजगार मोहीम अर्थात प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

लातूर कौशल्य विकासरोजगार व उद्योजकतामार्गदर्शन केंद्र हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करते. सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्लेसमेंट ड्राईव्ह मोहीम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये लातूर येथील क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. मध्ये फील्ड ऑफिसर पदांच्या 10 जागांसाठी इयत्ता बारावीकोणतीही पदवीटू व्हिलर लायसन्स असलेल्या उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. तसेच लातूर येथील इव्कीनॉस टेक्नोलॉजीमध्ये टेक्निशियन, सेल्सपर्सनसेल्स मॅनेजरवेल्डर पदांच्या 5 जागांवर रोजगार मिळणार असून यासाठी इयता बारावीकोणतीही पदवीसंबंधित आयटीआय ट्रेड अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखत देवून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळेल.

प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभागी होण्यासाठी महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी शुक्रवार, 28 जून, 2024 रोजी जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र लातूर येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा रिझ्युमबायोडाटापासपोर्ट फोटो सोबत आणावेत. तरी या संधीचा लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन लातूर जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या 02382-299462 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा