उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेसाठी विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेसाठी विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांना बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यास 20 जून, 2024 पर्यंत मुदत राहणार आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे 24 जून, 2024 पर्यंत शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थी याद्या जमा कराव्यात. या परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्वीकरण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट, 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच भरावी. ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना फेब्रुवारी – मार्च, 2024 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीसुधार विद्यार्थ्यासाठी जुलै-ऑगस्ट, 2024 व फेब्रुवारी –मार्च, 2025 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील. सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment