छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे 24 जून रोजी लातूर येथे आयोजन
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे
24 जून रोजी लातूर येथे आयोजन
· पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार उद्घाटन
लातूर, दि. 20 (जिमाका) : येथील औसा रोडवरील वाडा हॉटेलजवळील कस्तुराई मंगल कार्यालय येथे 24 जून 2024 रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे.
क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्यासह विविध कार्यालयाचे विभाग प्रमुख, प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत.
शिबिरामध्ये इयत्ता दहावी, बारावीनंतर काय ? भविष्यातील रोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, बायोडाटा तयार करणे व मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी याविषयी, तसेच शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बँका, विविध महामंडळे शासकीय योजनांची माहिती, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना याबाबत माहिती व करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ मार्गदर्शनाकडून मार्गदर्शन होणार आहे.
लातूर येथे होत असलेल्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरास सर्व युवक-युवती व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यंनी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी कु. एम. आर. बोरुळकर आणि कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बी. एस. मरे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment