क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

लातूरदि. 13 (जिमाका) : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याणबंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे 14 जून, 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. बनसोडे यांचे 14 जून रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर रेल्वे स्टेशन लातूर येथे आगमन होईल व मोटारीने शंकुतला निवासस्थानाकडे प्रयाण करतील. सकाळी 10.30 वाजता लातूर येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता उदगीरमधील भगीरथी नगर (समता नगर) येथील संकट मोचन हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 12.05 वाजता नळेगाव रोडवरील कृष्णाई मंगल कार्यालय येथे श्री. तात्याराव परबतराव पाटील यांच्या मुलाच्या साखरपुडा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 12.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चिद्रेवार टॉवर येथील लोकराजे बँकीग सेवा दि. लोकराजे शाहू महाराज मल्टीस्टेट ॲग्रो को-ऑप. सोसायटी लि. शाखा उदगीरच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहतील.

ना. बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी वाजता उदगीर शासकीय विश्रामगृह येथे खरीप हंगाम पूर्व -2024 आढावा बैठक व नैसर्गिक आपत्तीत (विज पडून) मृत्यूमुखी पडलेले शेतकरी कुटूंबियास व पुशपालक यांना धनादेश वितरण केले जाईल. सांयकाळी वाजता उदगीर येथील नागुरे मंगल कार्यालयासमोर प्रा. डॉ. संजय मुळे यांच्या‍ निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सांयकाळी 5.20 वाजता उदगीर शहरातील गांधीनगर येथे श्री. करण गुणाजी कांबळे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. सांयकाळी 5.40 वाजता फुले नगर येथे श्रीमती निर्मलाबाई काळे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, सांयकाळी 5.55 वाजता फुले नगर येथील श्री. अशोकराव भालेराव यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, सांयकाळी 6.30 वाजता उदगीर तालुक्यातील मलकापूर येथे श्री. रमेश अर्जुन भालेराव यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 7 वाजता तोंडार येथे श्री. निळकंठ बिरादार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील व सोयीनुसार लातूरकडे प्रयाण करतील. लातूर येथे शकुंतला निवासस्थान येथे आगमन व राखीव.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु