तोंडारपाटी येथील शासकीय निवासी शाळेमधील रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

 तोंडारपाटी येथील शासकीय निवासी शाळेमधील रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

इयत्ता दहावीच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम

लातूरदि. 06 (जिमाका) : उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीमध्ये रिक्त जागेसाठी नाव नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभागाच्या तोंडारपाटी येथील शासकीय निवासी शाळेत इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीपर्यंत रिक्त जागांवर प्रवेश उपलब्ध आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 80 टक्केअनुसूचित जमातीसाठी 10 टक्केविमुक्त जाती व जमाती 5 टक्केदिव्यांग प्रवर्गासाठी 3 टक्के आणि विशेष मागास प्रवर्गासाठी 2 टक्के जागा राखीव आहेत. आयएसओ नामांकन मिळवणारी ही लातूर सामाजिक न्याय विभाग अंतर्गत दुसरी शाळा आहे. तसेच या शाळेत महाराष्ट्र शासन व कला संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या एलिमेंटरी व इंटरमिडीयट परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यात येते.

प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेमध्ये एक वेळ नाश्तादूधअंडीकेळीसफरचंद इत्यादी दिले जाते. तसेच दोन वेळा पोटभर व रुचकर जेवण देण्यात येते. तसेच 2 गणवेशआवश्यक शैक्षणिक साहित्यदैनंदिन वापरवायचे साहित्य (साबणसोडातेलपेस्टब्रश इ.) देण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कॉटगादीउशीबेडशीटकंबल व पेटी देण्यात येते. निवासी शाळेमध्ये दोन हजारपेक्षा जास्त संदर्भ पुस्तकांचे ग्रंथालयई- लायब्ररीतसेच दररोज वृत्तपत्रे वाचनासाठी दिली जातात.

शासकीय निवासी शाळेत अत्याधुनिक प्रयोगशाळाडिजिटल वर्गाखोल्यासंगणक प्रयोगशाळा पिण्यासाठी आरओ पाणी24 तास सुरक्षा रक्षक24 तास वीज पुरवठा व्यवस्थाइनडोअर सुसज्जा जीमआऊटडोअर जीमअनुभवी व तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांनी या शाळेत प्रवेशासाठी 30 जून 2024 पर्यंत नोंदणी करून प्रवेश घ्यावेतअसे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा