लातूर जिल्ह्यातील 536 संशयित क्षयरुग्णांचे फिरत्या व्हॅनद्वारे काढण्यात आले एक्स-रे

 लातूर जिल्ह्यातील 536 संशयित क्षयरुग्णांचे

फिरत्या व्हॅनद्वारे काढण्यात आले एक्स-रे

लातूरदि. 12 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व संशयित क्षयरुग्णांचे एक्स-रे काढण्यासाठी राज्य क्षयरोग नियत्रंण व प्रशिक्षण केंद्राकडून एक एक्स-रे व्हॅन उपलब्ध करुन देण्यात आली होती. या व्हॅनद्वारे जिल्ह्यात 3 जून ते 8 जून या कालावधीत 536 संशयित रुग्णांचे एक्स-रे काढण्यात आले.

जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबिवले जात आहेत. या अंतर्गत क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्याच्यावंर औषधोपचार केले जात आहेत. दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस खोकला असणेताप असणेवजणात लक्षणीय घट होणेथुंकीवाटे रक्त पडणेमानेवर गाठ येणे आदी क्षयरोगाची लक्षणे समजली जातात. त्यामुळे यापैकी कोणतेही लक्षण असले तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ला घेणे गरजेचे आहे.

एक्स-रे व्हॅनच्या माध्यमातून औसा तालुक्यात (उजनी-33)लातूर तालुका (जवळा-25भातांगळी-29)जळकोट तालुक्यात (वांझरवाडा-115अतनूर-119)निलंगा तालुक्यात (हलगरा-21औराद शहाजनी-53)शिरुर अनंतपाळ तालुक्यातील 119 व देवणी तालुक्यात (वलांडी-22) असे एकूण 536 एक्स-रे काढण्यात आले आहेत.

एक्स-रेद्वारे निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांना सरकारी दवाखान्यातून मोफत तपासणी व औषध उपचार दिले जातील. तसेच क्षयरुग्णांना उपचार कालावधीत शासनामार्फत प्रतिमहा 500 रुपये पोषण आहारासाठी दिले जातात.

पुणे येथील राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुध्द देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन राऊतडॉ. डी.के रुपनर यांच्या नियोजनानुसार मोबाईल एक्स-रे व्हॅनद्वारे संशयितांचे एक्स-रे करण्यात आले आहेत. तसेच राज्य क्षयरोग नियत्रंण सोसायटीतर्फे चिंतामणी साठेश्री. गिराम क्ष-किरण तंत्रज्ञ व शशिकांत लोहार यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारीवैद्यकीय अधिकारीवरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षकएसटीएलएसटीबीएचव्हीआरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांनी तपासणीसाठी सहकार्य केले.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु