मृगबहार 2024-25 साठी जिल्ह्यातील फळपिकासाठी विमा योजना लागू

                                                       मृगबहार 2024-25 साठी

जिल्ह्यातील फळपिकासाठी विमा योजना लागू

लातूरदि. 2(जिमाका) : मृग बहार 2024-2025 मध्ये लातूर जिल्ह्यातील डाळींबलिंबू, पेरुसिताफळ व चिकू या पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना 2024-2025 या कालावधीत लातूर जिल्ह्यामध्ये अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

योजना कार्यान्वित करणारी बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे ही विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्राने नोंदविल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. जिल्ह्यामध्ये सदर योजना या विमा कंपनीमार्फत कार्यान्वित केली जात आहे.

 डाळींब या फळपिकासाठी अहमदपूर तालुक्यातील  किनगाव, अहमदपूरखंडळी, उदगीर तालुक्यातील नागलगावहेर, औसा तालुक्यातील औसालामजनाकिनीथोटकिल्लारीबेलकुंडभादाचाकूर तालुक्यातील चाकूरनळेगाववडवळ नागनाथ, निलंगा तालुक्यातील निलंगाऔराद शहाजनी, रेणापूर तालुक्यातील कारेपूरपानगाव महसूल मंडळांचा या योजनेत समावेश आहे. तसेच डाळिंब या पिकासाठी पीकविमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 14 जुलै, 2024 पर्यंत आहे. या फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम लाख 60 हजार रुपये असणार आहे. शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम हजार रुपये राहील.

चिकू या फळपिकासाठी अहमदपूर तालुक्यातील  अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर महसूल मंडळाचा समावेश असून या फळपिकासाठी पीकविमा हप्ता भरण्याची अंतिम 30 जून, 2024 राहील. तर विमा संरक्षित रक्कम रुपये 70 हजार रुपये आणि शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम हजार 500 रुपये राहील.

पेरु या फळपिकासाठी अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर, खंडाळीशिरुर ताजबंदहाडोळती, औसा तालुक्यातील मातोळाउजनी, जळकोट तालुक्यातील घोणसीजळकोट महसूल मंडळात विमा योजना लागू आहे. या फळपिकासाठी पीकविमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 25 जून, 2024 राहील. तर विमा संरक्षित रक्कम रुपये 70 हजार रुपये आणि शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम हजार 500 रुपये राहील.

लिंबू या फळपिकासाठी उदगीर तालुक्याला हेर महसूल मंडळाचा समावेश असून या पिकासाठी पीक विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 25 जून, 2024 राहील. विमा संरक्षित रक्कम 80 हजार रुपये आणि शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम हजार रुपये राहील.

सिताफळ या फळपिकासाठी अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद, औसा तालुक्यातील उजनीबेलकुंड, चाकूर तालुक्यातील आष्टानिलंगा तालुक्यातील औराद शहाजनीरेणापूर तालुक्यातील रेणापूरपळशीपोहरेगावपानगावकारेपूर, लातूर तालुक्यातील हरंगुळ बु., कन्हेरी, मुरुड बु. महसूल मंडळाचा समावेश राहील. या फळपीकविमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2024 राहील. तर विमा संरक्षित रक्कम 70 हजार रुपये आणि शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम हजार 500 हजार रुपये राहील.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक असून कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत भाग घेणे अथवा न घेण्याबाबत संबंधित बँकेकडे विहीत नमुन्यात घोषणापत्र व अर्ज सादर करावा. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे ऑनलाईन फळपिक विमापोर्टल www.pmfby.gov.in वर सहभाग नोंदवावा. त्यासाठी अर्जदाराने आपल्या अर्जासोबत अधारकार्डआधार नोंदणी प्रतजमिनधारक सातबाराआठ अ उतारा व फळबागेचा (जिओ टँगिग) केलेला फोटोभाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामासहमतीपत्र आणि बँक पासबुक प्रत सादर करुन प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे. अधिक माहिती माहितीसाठी विमा कंपनीच्या 1800 209 5959 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव यांनी केल आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु