साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या
कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा
लातूर, दि. 11 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग समाजातील व तत्सम 12 पोट जातीतील महिला, पुरुष घटकांची आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिकाअधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महामंडळामार्फत थेट कर्ज येाजना (कर्ज मर्यादा एक लाख), तसेच केंद्र शासनाकडून पीएम अजय योजना राबविण्यात येते. या योजनांचे कर्ज प्रस्ताव अथवा अर्ज ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी www.lokshahir.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.
मातंग समाजातील गरजू शहरी, ग्रामीण भागातील महिला व पुरुष लाभार्थ्यांनी या कर्ज योजनांसाठी अर्ज करावे. तसेच लाभार्थ्यांने www.lokshahir.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन एक प्रत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी, असे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, तळमजला, लातूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*****
Comments
Post a Comment