खरीप पिकांसाठी 1 रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

 खरीप पिकांसाठी 1 रुपया विमा हप्ता भरून

प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

·        विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत

·        सीएससी केंद्रात विनाशुल्क विमा प्रस्ताव सादर करण्याची सुविधा

लातूर, दि. 2(जिमाका) : खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री विमा योजनेतंर्गत 1 रुपयात विमा संरक्षण देण्यात येणार असून यासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 15 जुलै, 2024 पर्यंत आहे. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर आपले विमा प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

 विमा सहभाग नोंदवताना आपला मोबाईल क्रमांक इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करावा जेणेकरुन विमा सहभागाबाबतची माहिती एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना दिली जाईल. सीएससी. केंद्रबँक यांनी शेतकऱ्यांकडून तलाठ्यामार्फत साक्षांकित केलेला सातबारा देण्याचा आग्रह करु नये. सीएसएसी केंद्र चालकांनी विना शुल्क विमा भरुन घ्यावा. कर्जदार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होणे अथवा न होण्याबाबत कर्ज खाते असलेल्या बँक शाखेत विहीत नमून्यात स्वतंत्र घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्जदार शेतकरी घोषणापत्र देणार नाहीतत्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

इच्छुक शेतकऱ्यांना अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयातएसबीआय. इन्शुरन्स विमा कंपनीमार्फत कार्यरत पीक विमा सुविधा व सल्ला केंद्रामध्ये, नजीकच्या बँकेत किंवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावरुन माहिती उपलब्ध करुन घेता येईल. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई-पीक पाहणी या मोबाईल ॲपवर अचूक माहिती नोंदवावी. विमा संरक्षित पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक यात तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल. कर्जदार शेतकऱ्यांनी विमा संरक्षित क्षेत्रामध्ये पीक बदलाबाबत सूचना देण्याचा अंतिम दिनांक विमा नोंदणीच्या अंतिम दिनांक विमा नोंदणीच्या अंतिम दिनांकापूर्वी 2 कार्यालयीन दिवस अगोदर असेल.

शेवटच्या टप्प्यात गर्दी व घाई न करता वेळेत आपल्या अधिसूचित पिकाचे विमा संरक्षणासाठी नजीकच्या बँकेत नागरी सुविधा केंद्रामार्फत पीक विमा संरक्षण घ्यावेअसे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा