अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात मिळणार मोफत प्रवेश

 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात मिळणार मोफत प्रवेश

·         छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड व लातूर जिल्ह्यात 14 वसतिगृहे

लातूर, दि. 2(जिमाका) : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह प्रवेश योजना राबविण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर एकात्मिक आदिवीसी विकास प्रकल्पातंर्गत छत्रपती संभाजीनगरजालनाबीड व लातूर या चार जिल्ह्यातील 14 वसतिगहामध्ये प्रवेशासाठी व जिल्हास्तरावर इयत्ता अकरावीपासून नंतरच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरु झालेलली असून वसतिगृह क्षमता 2 हजार 775च्या अनुषंगाने रिक्त असलेल्या 1 हजार 78 जागांवरऑनलाईन प्रणालीवर प्राप्त झालेल्या अर्जामधील पात्र विद्यार्थी, विद्यार्थींनींना प्रवेश देण्याची कार्यवाही वसतिगृह स्तरावर सुरु आहे. वसतिगृह प्रवेशासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले असून विद्यार्थ्यांनी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावातसेच अर्ज भरल्यानंतर संबंधित गृहप्रमुखगृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. अनुसूचित जमातीच्या पात्र विद्यार्थी, विद्यार्थीनींनी या वसतिगृह योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. 0240-2486069 यावर संपर्क साधावा, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु