रेणा नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 रेणा नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा


लातूर, दि. 11 : जिल्ह्यात 10 जून 2024 रोजी रात्री झालेल्या पावसामुळे रेणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रेणा नदीवरील घनसरगाव, रेणापूर, जवळगा व खरोळा बंधारा येथील पाणीपातळी पूर्ण संचय पातळीच्यावर गेली आहे. त्यामुळे रेणा नदी काठावरील गावांमध्ये पुर परिस्थिती निर्माण होऊ शकते. 


हवामान केंद्राद्वारे मुसळधार पावसाचा इशारा प्राप्त झाला आहे. अशा परिस्थितीत रेणा नदी काठावरील गावातील नागरीक, शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करून राहिलेले नागरिक यांना लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु