आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा लातूर दौरा
▪️ ‘आरोग्य संवाद यात्रा’ व योजनांचा आढावा
लातूर, दि. २४ : राज्य शासनाच्या आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश स. शेटे हे बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
डॉ. शेटे यांचे २५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन होईल. त्यांच्या उपस्थितीत एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेचे होईल. सायंकाळी ४ वाजता लातूर शहरातील अंबाजोगाई रोड येथील येलाले हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी करतील. सायंकाळी ५ वाजता वाजता औसा तालुक्यातील भादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला देतील.
Comments
Post a Comment