हर घर तिरंगा अभियान अंतर्गत लातूर येथे आयोजित तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!
हर घर तिरंगा अभियान अंतर्गत लातूर येथे आयोजित तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!
जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दाखविली हिरवी झेंडी
लातूर, दि. 13 : हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत नागरिक, विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहूल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, क्रीडा उपसंचालक मिलिंद दीक्षित, माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, उपशिक्षणाधिकारी संजय क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी बी. के. हाशमी, जिल्हा क्रीडा अधिकारी जयराज मुंडे यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक यावेळी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुल येथून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. देशिकेंद्र माध्यमिक विद्यालय, ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, दयानंद कला महाविद्यालय, दयानंद वाणिज्य महाविद्यालय, राजर्षी शाहू महाविद्यालय, शिवाजी माध्यमिक विद्यालय आदी शाळांचे सुमारे 2700 विद्यार्थी उत्स्फूर्तपणे रॅलीत सहभागी झाले होते.
***
Comments
Post a Comment