उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. १३ (जिमाका) : सन २०२५-२६ या वर्षासाठीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांनी २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास, नागरिकांना उत्तम ग्रंथालयीन सेवा आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क आणि ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये रोख पुरस्कार दिला जातो. यासोबत सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते. सन २०२५-२६ च्या पुरस्कारासाठी इच्छुक ग्रंथालये, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवकांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये विहित मुदतीत संबधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असेही श्री. गाडेकर यांनी कळवले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास