जिल्हास्तरीय लोकशाही दिन पहिल्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन तिसऱ्या सोमवारी
जिल्हास्तरीय लोकशाही दिन पहिल्या सोमवारी
तालुकास्तरीय लोकशाही दिन तिसऱ्या सोमवारी
लातूर, दि. 13 (जिमाका) : नागरिकांच्या तक्रारी व अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी, लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाततर तालुकास्तरीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी संबंधित तहसील कार्यालयात आयोजित करण्यात येतो. जिल्हास्तरीय लोकशाही दिन होतो.
लोकशाही दिनासाठी अर्जदाराने आपला वैयक्तिक स्वरूपाचा अर्ज विहित नमुन्यात दोन प्रतींत सादर करावा. जिल्हास्तरीय लोकशाही दिनासाठी अर्ज लोकशाही दिनाच्या किमान 15 दिवस आधी सादर करणे आवश्यक आहे.
तालुकास्तरीय लोकशाही दिनात सादर केलेल्या अर्जावर 30 दिवसांच्या आत कार्यवाही झाली नाही, तर संबंधित अर्जदाराला जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करता येतो.
जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास, त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी लोकशाही दिन आयोजित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
****
Comments
Post a Comment