कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी..... जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने 21 व 22 मार्च रोजी बंद ठेवण्याचे आदेश लातूर,दि.20:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी दि. 21 व 22 मार्च 2020 रोजी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज व्हीसी व्दारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत आहे. या विषाणुला रोखण्यासाठी जनतेने स्वयस्फुर्तीने बंद पाळणे आवश्यक आहे. दि. 21 व 22 मार्च रोजी जनतेने घराबाहेर पडू नये, अशी सूचना त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर जिल्हयांतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ...
Posts
Showing posts from March, 2020
- Get link
- X
- Other Apps
खाजगी उद्योग कारखाने कंपन्यातील कर्मचाऱ्यांना रोटेशन पध्दत लागू *वर्क फॉर होम करण्याचे निर्देश लातूर,दि.20: - शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लातूर जिल्हयातील खाजगी उद्योग आस्थापना/ कारखाने/ कंपन्या मध्ये काम करणारे कर्मचारी पैकी एका दिवसात 50 टक्के कर्मचारी व दुसऱ्या दिवशी उर्वरित 50 टक्के कर्मचारी (रोटेशन पध्दत ) कामकाज करण्याबाबत संबंधित खाजगी उद्योग आस्थापना यांनी आवश्यक ती कार्यवाही करणेसाठी याव्दारे आदेशित करीत आहे. तसेच जे कर्मचारी Work from Home करु शकतात त्यांचे त्यांच्याकडून त्यांना Work from Home च्या सूचना देण्यात याव्यात. या आ...
- Get link
- X
- Other Apps
जिल्हयातील सर्व पान शॉप /पान टपऱ्या 31 मार्च पर्यंत बंद लातूर,दि.20: - शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लातूर जिल्हयातील तंबाखू व तंबाखूजन्य धूम्रपानाचे पदार्थ इ. ची विक्री करणारी सर्व दुकाने/ पान शॉप/ पान टपऱ्या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर विरुध्द भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात यावी सदरहू आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे नि...
- Get link
- X
- Other Apps
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत साथरोग नियंत्रण प्रयोगशाळेला मंजुरी लातूर,दि.20:- लातुर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज रोजी पर्यंत एकुण 25 कोरोना संशयीत व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन त्यापैकी 18 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असुन ते सर्व अहवाल निगेटीव्ह आलेले असुन ७ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत एकही कोरोना संशयित / बाधित रुग्ण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात नाही. तसेच कोरोना बाधित / संशयित रुग्णांसाठी एकुण ३७ खाटा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ३० खाटांची वाढ करण्यात आली असुन कोरोना बाधित / संशियत रुग्णांसाठी एकुण ६७ खाटा दिनांक 21 मार्च 2020 रोजी सायंकाळ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नाने साथरोग नियंत्रण प्रयोगशाळा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय ...
- Get link
- X
- Other Apps
जिल्हयातील 25 प्रवासी/सहवासितांचे अहवाल निगेटीव्ह * जिल्हयात कोरोना विषाणू संसर्ग सदृस्य लक्षण असणारा एक ही रुग्ण् नाही लातूर,दि.20:- जिल्हयात आजतागायत कोरोना कोविड-19 आजाराचे एकूण 25 प्रवासी/ सहवासितांचे स्वॅब (Throat Swab) तपासणीसाठी एन.आय.व्ही.पुणे या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले आहेत. त्यापैकी-18 प्रवासी/सहवासतिांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून -7 प्रवासी/सहवासितांचे तपासणी अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. कोरोना या विषाणूचा संसर्ग सदृश्य लक्षणे असणारा एकही रुग्ण् लातूर जिल्हयात आढळून आलेला नाही असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी कळविले आहे. लातूर जिल्हयात बाहेर देशातून /राज्यातून/ जिल्हयातून आलेले प्रवासी व सहवासित यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.लातूर जिल्हयात जिल्हास्तरावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र बाहरुग्ण् विभाग सुरु करण्यात आलेला आहे.तसेच - 47 खाटांचे विलगीकरण कक्ष (Isolation ward) सुरु करण्यात आलेले असून सदर कक्ष - 24 तास कार्यान्वित करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत...
- Get link
- X
- Other Apps
बालकामगार प्रथेविरुध्द जनजागृती मोहिम लातूर,दि.20:- महाराष्ट्र राज्यातून बाल मजुरी या प्रथेचे समुळ उचाटन करुन बाल मजुरांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात समाविष्ठ करुन घेणे व आवश्यकता असल्यास त्यांचे कुटुंबाचे पुर्नवसन करणे बाल मजुरांची मालकांच्या तावडीतुन मुक्तता करण्याच्या उद्देशाने उद्योग उर्जा कामगार विभाग, अन्वये प्रत्येक जिल्हयात जिल्हा दंडाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कृती दल गठीत करण्यात आलेले आहे. दिनांक 17 मार्च 2020 ते 23 मार्च 2020 या कालावधीत बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती अभियान राबविण्यात येत असून जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्थानीक केबल ऑपरेटर्स मार्फत प्रसिध्दी, हॉटेल, ढाबा,मॉल्स, दुकाने, ऑटोरिक्षा इत्यादी ठिकाणी पोस्टर तसेच स्टिकर्स लावण्यात येत आहेत. तसेच लातूर जिल्हा बाल कामगार मुक्त करण्याचा अनुषंगाने त्यास जनजागृती करण्यात येत आहे. बाल व किशोर वयीन कामगार (प्रतिबंध व नियमन ) अधिनियम ,1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात / प्रक्रियेत कामावर ठेवणे तसेच 14 वर्ष पूर्ण परंतु 18 वर्ष पुर्ण न झालेले किशोर वयीन मुलांना धोकादाय उद्योग व...
- Get link
- X
- Other Apps
कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत कृषि यांत्रिकीकरण व नविन विहीरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन लातूर,दि.20: - नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत लातूर जिल्हयातून निवडलेल्या गावातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी तोंड देण्यास सक्षम करणेसाठी कृषि यांत्रिकीकरण व नविन विहीर या घटकास प्रोत्साहन देणे, पिक रचनेनुसार आवश्यक कृषि औजारे घेण्यासाठी प्रकल्प गावातील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणे, कृषि यांत्रिकीकरणाच्याव्दारे रुंद वाफा व सरी तंत्रज्ञान आणि इतर हवामान अनुकुल तंत्रज्ञानाचा अवलंब वाढविणे तसेच नविन विहीर या घटकांमुळे संरक्षित सिंचनाची सोय करणे व पिक उत्पादन वाढविणेच्या उद्देशाने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान अनुकुल कृषि यांत्रिकीकरण व नविन विहीर या घटकास शासनाने मान्यता दिलेली असून त्या बाबतच्या मार्गदर्शक सुचना http://dbt.mahapocra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध् आहेत. तरी प्रकल्प गावातील शेतकऱ्यांनी वरील संकेतस्थळावर आपले गावचे समूह सहाय्यकाच्या मदतीने ऑनलाईन नोंदणी करुन अर्ज करावा. ट्रॅक्टर सोबत BBF या यंत्रासाठी अ...
- Get link
- X
- Other Apps
नागरिकांनी खबरदारी घ्यावी पालकमंत्री अमित देशमुख यांचे आवाहन लातूर,दि.20:कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासा ठी सर्वत्र दक्षता घेण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लातूर जिल्हा आणि शहरातील नागरिकांनी अधिक सतर्क रहावे असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालक मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. शासनस्तरावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना नागरिकांची साथ मिळणे गरजेचे आहे. नागरिकांनी आवश्यक्ता नसताना घरा बाहेर पडू नये, अनावश्यक गर्दी टाळावी, त्याच प्रमाणे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, आपले हात सातत्याने स्वच्छ धुवावेत, चेहऱ्याला हात लाऊ नयेत, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करुनये किंवा अशा कार्यक्रमात सहभागी होऊ नये, अन्यत्र प्रवास करणे टाळावे, धार्मिक कार्यक्रम विवाह पुढे ढकलावेत, गैर समज पसरविणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नये त्याच प्रमाणे शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन...
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर,दि.19:- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये लातूर जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत दि. 17 मार्च 2020 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते दि. 31 मार्च 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा, अंत्ययात्...
- Get link
- X
- Other Apps
जिल्हयातील 19 प्रवासी/सहवासितांचे अहवाल निगेटीव्ह * जिल्हयात कोरोना विषाणू संसर्ग सदृस्य लक्षण असणारा एक ही रुग्ण् नाही लातूर,दि.19:- जिल्हयात आजतागायत कोरोना कोविड-19 आजाराचे एकूण 24 प्रवासी/ सहवासितांचे स्वॅब (Throat Swab) तपासणीसाठी एन.आय.व्ही.पुणे या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले आहेत. त्यापैकी - 19 प्रवासी/सहवासतिांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून - 5 प्रवासी/सहवासितांचे तपासणी अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. कोरोना या विषाणूचा संसर्ग सदृश्य लक्षणे असणारा एकही रुग्ण् लातूर जिल्हयात आढळून आलेला नाही असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी कळविले आहे. लातूर जिल्हयात बाहेर देशातून /राज्यातून/ जिल्हयातून आलेले प्रवासी व सहवासित यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.लातूर जिल्हयात जिल्हास्तरावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र बाहरुग्ण् विभाग सुरु करण्यात आलेला आहे.तसेच - 47 खाटांचे विलगीकरण कक्ष (Isolation ward) सुरु करण्यात आलेले असून सदर कक्ष - 24 तास कार्यान्वित करण्यात आलेला आहे. सद्यस्थि...
- Get link
- X
- Other Apps
प्रदेशिक परिवहन कार्यालयामार्फत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपयायोजना लातूर,दि.19:- प्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध कामानिमित्त मोठया प्रमाणात अभ्यांगतांचे येणे जाणे असल्यामुळे गर्दी जमा होत असते. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची संभावना कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारीचा उपाय म्हणून परिवहन आयुक्त यांच्या परिपत्रकान्वये मार्गदर्शक सुचना नुसार पुढील प्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. दि. 31 मार्च 2020 पर्यंत शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी बंद राहील. पक्क्या अनुज्ञप्ती चाचणी दि. 31 मार्च 2020 पूर्वी संपते त्यांची चाचणी घेण्यात येईल. सार्वजनिक वाहन बिल्ला ( बॅज) व कंडक्टर बॅजसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध् करुन देण्यात आली असून सार्वजनिक वाहन बिल्ला (बॅज) व कंडक्टर बॅजसाठीची चाचणी दि.31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्यात आलेली आहे. अनुज्ञपतीमध्ये नवीन वर्गाची नोंद घेण्ययासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध् करुन देण्यात आली असून अनुज्ञप्तीमध्ये नवीन नोंद घेण्यासाठीची चाचणी दि.31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्यात आली आहे. दि. ...
- Get link
- X
- Other Apps
आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन सुचनाचे पालन करावे -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत लातूर,दि.19:- आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण् आढळत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाव्दारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचे संशयित रुग्ण् राज्यातील विविध ठिकाणी आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. परदेश दौऱ्यावरुन आलेल्या नागरिकांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे व त्यामध्ये 14 दिवसांसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये पुढील मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. घरात विलगीकरण कक्षाबाबत मार्गदशक सूचना :- घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने हवेशीर आणि वेगळी खोली ज्याला संडास बाथरुम...
- Get link
- X
- Other Apps
साथरोग प्रतिबंधात्मक आदेशानुसार सनियंत्रण समिती स्थापना लातूर,दि.19:- शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररीत्या निर्गमित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय, अंगणवाडी, व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे येथे कार्यरत असलेले शिक्षक, प्राध्यापक ,अंगणवाडी सेविका, आशा तसेच आरोग्य कर्मचारी यांनी आपआपल्या शैक्षणिक संकुल परिसरात / कार्यक्षेत्राच्या गावामध्ये उपस्थित राहून तेथील स्थानिक नागरिकांच्या घरोघरी जाऊन लहान-लहान समुहास (कमाल मर्यादा 10 नागरिकास) कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश देत आहे. आरोग्य विभागाच्या अधिनस्त आरोग्य पर्यवेक्षक / आरोग्य सेवक/ आ...
- Get link
- X
- Other Apps
हॉटेल, धाबे परमिटरुम चालकांनी आपत्ती व्यवस्थापन सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत लातूर,दि.19:- लातूर जिल्हयात सर्व प्रकारचे हॉटेल, धाबे ,परमिटरुम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भंडार इत्यादी ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे जिल्हयात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लातूर जिल्हयातील सर्व प्रकारचे हॉटेल, धाबे, परमिटरूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भंडार इत्यादी ठिकाणी पुढील प्रमाणे उपाययोजना करणे बंधनकारक करीत आहे. हॉटेल मधील दोन टेबल मधील अंतर किमान तीन (3) मीटर असावे. हॉटेल मधील प्रत्येक टेबलावर दोन ते तीन पेक्षा अधिक व्यक्ती बसणार नाहीत याची दक्षता घ्यावी, हॉटेल बाहेरील खुल्या जागेतील व्यवसायाच्या ठिकाणी (जसे चाट भंडार इत्यादी ) पाच पेक्षा जास्त व्यक्...
- Get link
- X
- Other Apps
मंगल कार्यालय 31 मार्च पर्यंत बंद लातूर,दि.19:- शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररीत्या निर्गमित करण्यात आली आहे. करोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना एक भाग म्हणून लातूर जिल्हयातील सर्व मंगल कार्यालय साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. ...
- Get link
- X
- Other Apps
जिल्हयातील 14 प्रवासी/सहवासितांचे अहवाल निगेटीव्ह * जिल्हयात कोरोना विषाणू संसर्ग सदृस्य लक्षण असणारा एक ही रुग्ण् नाही लातूर,दि.18:- जिल्हयात आजतागायत कोरोना कोविड-19 आजाराचे एकूण 19 प्रवासी/ सहवासितांचे स्वॅब (Throat Swab) तपासणीसाठी एन.आय.व्ही.पुणे या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले आहेत. त्यापैकी - 14 प्रवासी/सहवासतिांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून - 5 प्रवासी/सहवासितांचे तपासणी अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. कोरोना या विषाणूचा संसर्ग सदृश्य लक्षणे असणारा एकही रुग्ण् लातूर जिल्हयात आढळून आलेला नाही असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी कळविले आहे. लातूर जिल्हयात बाहेर देशातून /राज्यातून/ जिल्हयातून आलेले प्रवासी व सहवासित यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.लातूर जिल्हयात जिल्हास्तरावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र बाहरुग्ण् विभाग सुरु करण्यात आलेला आहे.तसेच - 47 खाटांचे विलगीकरण कक्ष (Isolation ward) सुरु करण्यात आलेले असून सदर कक्ष - 24 तास कार्यान्वित करण्यात आलेला आहे. सद्यस्थि...
- Get link
- X
- Other Apps
निवृत्ती वेतन धारकांनी जिल्हा कोषागार कार्यालय लातूर येथे येण्याचे टाळावे लातूर,दि.18:- जिल्हा कोषागार कार्यालय, लातूर अंतर्गत जवळपास 17300 निवृत्तीवेतनधारक निवृत्ती वेतन घेतात. निवृत्तीवेतन विषयक अडीअडचणींसाठी जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये राज्याच्या इतर जिल्हयांतून दररोज येणाऱ्या निवृत्ती वेतन धारकांची संख्या जास्त आहे. सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूंचा प्रसार झाला आहे. त्यामुळे आरोग्य विषयक गंभीर समस्या निर्माण झाली असून कोरोना विषाणूंमुळे बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने कोरोना विषाणूंचा प्रसार/ संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पुढील आदेशापर्यंत निवृत्तीवेतन धारकांनी जिल्हा कोषागार कार्यालय, लातूर येथे येण्याचे टाळावे. तसेच त्यांनी त्यांचे वैयक्तिक अडचणी/ कामासाठी कार्यालयाच्या 02382-245196 या दूरध्वनी क्रमांकावरुन संपर्क साधावा. तसेच काही लेखी अर्ज / म्हणणे असल्यास त्यांनी कार्यालयाच्या to.latur@zillamahakosh.in ...
- Get link
- X
- Other Apps
शिखर शिंगणापूर येथील चैत्र यात्रा रद्द प्रशासनाच्या आवाहनाला मंदिर ट्रस्टचा सकारात्मक प्रतिसाद * मराठवाड्यातील जनतेने शिखर शिंगणापूरला न येण्याचे सातारा जिल्हा प्रशासनाचे आवाहन लातूर,दि.18:-कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचे संसर्गाचे संकट रोखण्यासाठी या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करुन भाविकांसह सर्वांनीच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी केले. शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रेचा 25 मार्च ते 8 एप्रिल या कालावधी असून यात्रेसंदर्भात शिंगणापूर याठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी, माणचे तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी गोरख शेलार, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, मानकरी भाविक उपस्थित होते. ...